जिल्ह्यातील नऊ शाळा बंद
By Admin | Updated: July 14, 2015 23:14 IST2015-07-14T23:14:50+5:302015-07-14T23:14:50+5:30
खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून जिल्हा परिषदेमार्फत उपक्रम राबविले जात आहेत. मात्र खासगी शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण व अन्य सोयी-सुविधा चांगल्या प्रकारे

जिल्ह्यातील नऊ शाळा बंद
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय आखाडा भलताच तापला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी व त्याखालोखाल काँगे्रस या दोन पक्षांची सत्ता आहे. या दोन्ही पक्षांचा वारु रोखण्यासाठी शिवसेना व भाजप हे दोन पक्ष रिंगणात उतरले असून जागोजागी तिरंगी निवडणुकीचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. माण तालुक्यामध्ये ५७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आमदार जयकुमार गोरे, त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, माजी आमदार सदाशिव पोळ यांचे गट आक्रमक झाले आहेत. दहिवडी, गोंदवले बु., गोंदवले खु., पिंगळी या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. पाटण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमध्ये धूमशान सुरु झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळ गाव असणाऱ्या कुंभारगावातील सत्ता हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, जिल्हा बँकेचे माजी संचालक भगवानराव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आ. शंभूराज देसाई यांच्या गटाचे डॉ. दिलीप चव्हाण यांनीही तयारी सुरु केली असल्याने कुंभारगावात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. चिखलेवाडी, जानुगडेवाडी या ग्रामपंचायतींमध्येही मोठी टस्सल होणार आहे. पाटणकर गट अद्यापही सक्रिय नसला तरी आ. शंभूराज देसाई गटाने सत्ता टिकविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. जावळीत ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. कुडाळ, रायगाव, बामणोली तर्फ कुडाळ, महिगाव, सायगाव, हुमगाव, दरे खुर्द, वरोशी, करंदी तर्फ कुडाळ, खर्शी या गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, मोहन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुहास गिरी, निर्मला कासुर्डे, संगिता चव्हाण यांचे गट आक्रमक झाले आहेत. फलटणमध्ये ७८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये कोळकी, निंबोरे, साखरवाडी या प्रमुख ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व प्रल्हादराव साळुंखे पाटील यांचे गट साखरवाडीत समोरासमोर असणार आहेत. खटावमध्ये ८८ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये पुसेगाव, पुसेसावळी, सिध्देश्वर कुरोली, कातरखटाव या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे रणजित देशमुख यांचे गट वेगाने कामाला लागले आहेत. खंडाळा तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये विंग, सांगवी, खंडाळा, भादे, कणेरी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी राजकीय आखाडा तापला आहे. आमदार मकरंद पाटील, शिवसेनेच्या शारदा जाधव, हणमंतराव साळुंखे, आनंदराव गायकवाड, राजेंद्र नेवसे, बंटी महांगरे, साहेबराव महांगरे यांचे गट वेगाने कामाला लागले आहेत. वाईमध्ये ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून बावधन, पसरणी, उडतारे, बोपेगाव, शिरगाव, अभेपुरी या गावांत सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सातारा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी निगडीसाठी २, संगममाहुली १, सासपडे ३, विलासपूर १, निसरे २ उमेदवारी अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवशी सोमवारी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. (प्रतिनिधी) कऱ्हाडात दुसऱ्या दिवशी ३०० अर्ज ४कऱ्हाड : तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीसाठी पंचवार्षिक व एका ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुुकीच्या कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी १७ ग्रामपंचायतीसाठी ३९ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. तर अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी, १४ रोजी ४९ ग्रामपंचायतींसाठी ३०० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. उमेदवारांची संख्या वाढली असून दुसऱ्या दिवशी हजारमाची ग्रामपंचातीसाठी एकाच दिवसात सर्वाधिक २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ४अर्ज दाखल ग्रामपंचायतींमध्ये पोतले ग्रामपंचातीसाठी ७, तासवडे १२, विरवडे ७, करवडी २, कोडोली २, वस्ती साकुर्डी ८, गोळेश्वर १०, नांदलापूर १, चिखली १, गोटे १३, वहागांव २, शेरे १०, किरपे १, केसे १३, शिवडे २, अकाईचीवाडी २, नांदगांव १४, इंदोली २, पाल ११, शिरवडे ४, बनवडी २, वारूंजी २, गोटेवाडी २, काले ७, भरेवाडी २, येरवळे २, हणबरवाडी ३, गायकवाडवाडी ४, गमेवाडी ९, साजूर ३, कोणेगाव ८, येणके ३, शेणोली ५, हजारमाची २४, वाघेरी १, खालकरवाडी ५, ओंड २, विंग ११, मालखेड ६, कालवडे ९, वाठार ९, बेलवडे बुद्रूक ४, पेरले १३, वडगांव उंब्रज ४, घोणशी २०, कार्वे ३, खोडशी २, घारेवाडी ४ आणि सवादे ग्रापंचायतींसाठी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अशा एकूण ४९ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी ३०० उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. ४प्रांताधिकारी किशोर पवार व तहसीलदार राजेंद्र शेळके, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या वतीने भेदा चौकातील रत्नागिरी गोडावूनमध्ये इच्छुकांसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी उमेदवारांना २५ संगणकाद्वारे आपला उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. पाटणमध्ये ४९ अर्ज ४पाटण : पाटण तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ४९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पाचगणी २, शिवापूर ६, वाझोली ५, चव्हाणवाडी ६, काळगाव १८, कुंभारगाव ४, मालोशी १, तारळे ७. दरम्यान, सोमवारी काळगाव ३ कुंभारगाव २, तारळे ३, असे आठ अर्ज दाखल झाले होते. फलटणमध्ये ४0 अर्ज दाखल ४फलटण : फलटण तालुक्यात अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ४0 उमेदवारी अर्ज दाखल झाले. ढवळ १६, फरांदवाडी २, खुंटे १, कोळकी १, मलवडी ११, कोऱ्हाळे २, धूळदेव १, जाधवाडी २, पवारवाडी ३, शेरेचीवाडी १ अर्ज दाखल झाला. खटाव तालुक्यात ७६ आॅनलाइन अर्ज ४वडूज : खटाव तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती व ९ पोटनिवडणूकीसाठी अर्ज सोमवार दि. १३ पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. तडवळे दोन, वाकेश्वर एक, पुसेसावळी पाच, गोरेगाव-वांगी एक, जायगाव एक, अनकुळे दोन, दातेवाडी एक असे १३ फॉर्म लेखी स्वरूपात जमा केले. निवडणूक निरीक्षक म्हणून प्रदीप कडूसकर, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलसार विवेक साळुंके यांनी मतमोजणी मशीनची पाहणी केली.