हृदय बंद पडण्याअगोदर डॉल्बी बंद करा!

By Admin | Updated: August 18, 2015 00:46 IST2015-08-18T00:46:58+5:302015-08-18T00:46:58+5:30

ज्येष्ठांचा आवाज : कातरखटाव ग्रामसभेत सत्ताधारी-विरोधकांनी काढली एकमेकांची उणीदुणी

Close the Dolby Before the Heart Stops! | हृदय बंद पडण्याअगोदर डॉल्बी बंद करा!

हृदय बंद पडण्याअगोदर डॉल्बी बंद करा!

कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथे विविध जयंत्या, लग्न समारंभ, गावदेव, मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे आमच्या हृदयाचे ठोके बंद पडण्याची वेळ आली आहे. काळजाचे ठोके बंद पडण्याअगोदर गावात डॉल्बी बंदीचा प्रस्ताव काढा, असा आवाज कातरखटावच्या ग्रामसभेत ज्येष्ठांनी उठविला व ग्रामसेवकांना धारेवर धरले.
ज्येष्ठांनी घेतलेल्या डॉल्बीविरोधी भूमिकेला गावातील सर्व ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला. ग्रामसभेला महावितरणचे अधिकारी, लाईनमन, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, जनावरांचे डॉक्टर, शासकीय अधिकारी हजर नाहीत, त्यांना त्वरित बोलवावे. त्यानंतरच कोरमवर सह्या केल्या जातील व ग्रामसभा सुरू होईल, अशी भूमिका विरोधकांनी
घेतली.
तसेच मतदार ज्या-त्या वार्डामध्येच पाहिजे. या वार्डातील चार मतदार त्या वार्डात हा प्रकार आहे तो बंद झाला पाहिजे, तलाठी कार्यालयातील शासकीय कागदपत्रे व पुस्तके कोणत्याही खासगी माणसाच्या हातात गेली नाही पाहिजेत, नाहीतर अधिकाऱ्यावर कारवाई करावी,
अशी मागणी करत गावातील गटारे
तुंबली असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले.
ज्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत गेली वीस वर्षे दिलेल्या जागेपेक्षा वाढीव जागेचा वापर करीत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई
का करीत नाही, असा मुदा विरोधकांनी सरपंच व ग्रामसेवकांपुढे ठेवला.
या वादात विद्यमान सदस्यासह एकमेकाची उणीधुणीही काढली गेली. काही नागरिकांनी सत्ताधारी
तर काहींनी विरोधकांची तळी उचलून धरीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याने ग्रामसभेला कुस्तीच्या आखाड्याचे स्वरूप आले होते. मात्र या ग्रामसभेची चर्चा दिवसभर ग्रामस्थांमध्ये चालू होती. (वार्ताहर)

Web Title: Close the Dolby Before the Heart Stops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.