कृषी विभागामधील लिपिकांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:05+5:302021-09-08T04:47:05+5:30

अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान : तहसील विभागातील कामे दिल्याचा निषेध लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कृषी विभागातील लिपिकांना तहसील कार्यालयातील ...

Of the clerks in the Department of Agriculture | कृषी विभागामधील लिपिकांचे

कृषी विभागामधील लिपिकांचे

अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान : तहसील विभागातील कामे दिल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कृषी विभागातील लिपिकांना तहसील कार्यालयातील कामे देण्यात आली आहेत. याचा निषेध करत लिपिकांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन सुरू केले होते. मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन १३ सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्यावतीने देण्यात आलेली माहिती अशी की, जिल्ह्यात लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांची ८९ पदे मंजूर आहेत. त्यामधील ४९ पदे भरलेली असून ४० रिक्त आहेत. त्यानुसार उपविभाग, तालुकास्तरीय सर्व कार्यालयात ५० टक्क्यांहून अधिक लिपिक पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यामधील काही कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील कामासाठी घेतले आहे. अतिवृष्टीच्या कामासाठी घेतले असतानाही त्यांना विविध प्रकारची कामे लावण्यात येत होती. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा निषेध म्हणून लिपिकांनी मागील गुरुवार आणि शुक्रवारी काळ्या फिती लावून काम केले. तर सोमवारपासून लिपिक सामूहिक रजेवर गेले होते. मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी लिपिकांशी कामावर येण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विनंतीला मान देत १३ सप्टेंबरपर्यंत आंदोलन स्थगित केले. तरीही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द न झाल्यास १४ सप्टेंबरपासून पुन्हा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा कृषी विभागातील लिपिकांनी दिला आहे.

..................................................

Web Title: Of the clerks in the Department of Agriculture