शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणमध्ये नामांतर प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; नगरपालिकेत बहुमताने ठराव मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:36 IST

हद्दवाढ प्रस्तावात जाधववाडी परिसर

फलटण : पालिका इमारती व सभागृहांचा नामांतर प्रस्ताव फलटण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. मात्र यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे महापुरुषांची नावे देण्यावरून. या विषयावर सत्ताधारी व विरोधी गटात तीव्र खडाजंगी झाली. विरोधी सदस्यांनी पूर्वीची नावे बदलू नयेत, अशी भूमिका घेतली तर सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांच्या नावांचा सन्मान करण्याची भूमिका मांडली. नगराध्यक्षांनी हा विषय सर्वसामान्यांच्या भावनांशी निगडित असल्याचे सांगत महापुरुषांचे योगदान अधोरेखित केले. अखेर हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.फलटण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २५) नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेस नगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी खासदार गट व विरोधी राजे गटातील सर्व नगरसेवकांनी सभेत सहभाग नोंदवला.सभेत एकूण ४६ विषयांवर चर्चा झाली. पहिल्या विषयात सन २०२६-२७ साठी विविध विभागांच्या वार्षिक निविदा मागविण्याचा प्रस्ताव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतील कामांवर चर्चा करताना विकास काकडे यांनी त्यांच्या प्रभागात कमी कामे झाल्याची तक्रार मांडली. त्यावर नगराध्यक्षांनी मागणी न केल्यामुळे प्रभाग मागे राहिल्याचे स्पष्ट केले. उपसूचना मतदानात नाकारण्यात आली.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतील कामांवर चर्चा करण्यात आली. काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी थेट उत्तर द्यावे, अशी मागणी केली. ‘नमो उद्यान’ उभारणीच्या विषयावर चर्चा करताना स्मिता शहा यांनी वनविभागाच्या जागेचा विचार करावा, अशी सूचना केली.नगराध्यक्षांनी त्या प्रक्रियेस वेळ लागेल, असे सांगितले. पेठ मंगळवार येथील बुद्धविहार दुरुस्तीचा विषय सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. शहर विकास आराखड्याच्या विषयावर पंकज पवार यांनी झोपडपट्टी भागालाही निधी द्यावा, अशी सूचना केली. पप्पू शेख यांनी विरोधी सदस्यांचे मत ऐकले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्षांनी सर्व रस्ते सहा महिन्यांत सुधारण्याचे आश्वासन दिले.

हद्दवाढ प्रस्तावात जाधववाडी परिसरशहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर जाधववाडी परिसर प्राधान्याने समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली. फरांदवाडी येथील जागेवर स्टेडियम उभारणीचा विषयही चर्चिला गेला. विविध विकासकामांसाठी जमीन खरेदी, मनुष्यबळ उपलब्धता, कार्यालयीन सुधारणा, दिव्यांगांसाठी निधी वितरण अशा विषयांवरही चर्चा करण्यात आली.

थकीत गाळ्यांची जप्ती व फेरलिलाव, स्वीमिंग पूल भाडेतत्त्वावर निर्णय..शहरात नवीन शौचालये बांधणे, भुयारी गटार योजनेसाठी जागा खरेदी, विविध योजना राबविणे, एलएएन प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षक नेमणूक, वाहन खरेदी, बाजार व्यवस्थापन, वकील व आर्किटेक्ट नेमणूक, थकीत गाळ्यांची जप्ती व फेरलिलाव, स्वीमिंग पूल भाडेतत्त्वावर देणे अशा अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Falton Municipality Approves Renaming Proposal Amidst Heated Debate.

Web Summary : Falton Nagar Palika approved renaming buildings amidst opposition. Ruling and opposition clashed over honoring figures. Development work and infrastructure also discussed.