ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा वेळेत मिळतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:22+5:302021-07-22T04:24:22+5:30
रामापूर : ‘पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी, ही आमची मागणी होती. आमदार शशिकांत शिंदे ...

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा वेळेत मिळतील
रामापूर : ‘पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी, ही आमची मागणी होती. आमदार शशिकांत शिंदे यांच्या सहकार्याने व प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांमुळे निश्चित ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा वेळेत मिळतील,’ असे प्रतिपादन पाटण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
जिल्हा परिषदेकडून पाटण तालुक्यातील हेळवाक, मोरगिरी व केरळ या प्राथमिक आरोग्य केद्रांसाठी तीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा पाटण पंचायत समिती, पाटण येथे सत्यजितसिंह पाटणकर यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रताप देसाई, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, दूध संघाचे संचालक सुभाषराव पवार, डॉ. नितीन वांगीकर, डॉ. स्वप्नील कांबळे, डॉ. अमोल यादव, डॉ. प्रफुल्ल कांबळे व डॉ. मुसा चाफेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो -२१रामापूर
पाटण पंचायत समिती, पाटण येथे सत्यजितसिंह पाटणकर यांच्याहस्ते रुग्णवाहिका लोकार्पण केले. यावेळी राजाभाऊ शेलार, प्रतापभाऊ देसाई, बबनराव कांबळे, दिनकरराव घाडगे,
राजाभाऊ काळे, सुभाषराव पवार उपस्थित होते. ()
फोटो मेल वर