चोरगेवाडीच्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:18+5:302021-06-06T04:28:18+5:30

सातारा: तालुक्यातील चोरगेवाडी येथील एका महिलेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. गंगूबाई बाळकृष्ण साळुंखे (वय ५५, रा. चोरगेवाडी, ता. सातारा) ...

Chorgewadi woman dies of snake bite | चोरगेवाडीच्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

चोरगेवाडीच्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

सातारा: तालुक्यातील चोरगेवाडी येथील एका महिलेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. गंगूबाई बाळकृष्ण साळुंखे (वय ५५, रा. चोरगेवाडी, ता. सातारा) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ही घटना शुक्रवार, दि. ४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या पूर्वी घडली. राहत्या घराच्या पाठीमागे त्या साफसफाई करत असताना ही घटना घडली असून याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, गंगूबाई साळुंखे या राहत्या घराच्या पाठीमागे साफसफाई करत होत्या. यावेळी त्यांना सर्पदंश झाला. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी कण्हेर येथे दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी तात्काळ सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबतची खबर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सुयोग काटकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक पाटोळे हे करत आहेत.

Web Title: Chorgewadi woman dies of snake bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.