शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : चितळी शाळेच्या भिंतीला तडे; विटाही ढासळल्या, उपाययोजना न केल्यास टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 14:42 IST

चितळी, ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले असून, बांधकामाच्या विटाही ढासळू लागल्या आहेत. प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा चितळी ग्रामस्थांनी दिला आहे.

ठळक मुद्देतत्काळ उपाययोजना न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा शाळा दिवंगत भाऊसाहेब पवार यांच्या काळात जिल्हा परिषदेकडे वर्ग तेव्हापासून नाही शाळेची दुरुस्ती, देखभाल

मायणी : चितळी, ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले असून, बांधकामाच्या विटाही ढासळू लागल्या आहेत. प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा चितळी ग्रामस्थांनी दिला आहे.चितळी येथे १८८५ मध्ये शाळा सुरू करण्यात आली. या शाळेचे बांधकाम १९६२ मध्ये लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आले. तत्कालीन सरपंच दिवंगत  भाऊसाहेब पवार यांच्या काळात जिल्हा परिषदेकडे ही शाळा वर्ग करण्यात आली. तेव्हापासून या शाळेच्या दुरुस्ती, देखभाल करण्यात आली नाही.

माजी पंचायत समिती सदस्या आनंदी पवार व माजी पंचायत समिती सदस्य विनोद पंडित यांच्या फंडातून शाळेला कवले (कौले) पत्रा घालण्यात आला. मात्र भिंती, फरशी तशीच असल्यामुळे आज भिंतीला तडे गेले आहेत.

बारीक माती मिश्रीत दगड, विटा खाली पडत आहेत. ठिकठिकाणी फरशीही खचली आहे. त्यामुळे या शाळेच्या संपूर्ण खोल्या धोकादायक झाल्या आहेत. तसा दाखलाही बांधकाम विभागाने ९ जानेवारी २०१७ रोजी दिला आहे. ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत असून, यामध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शाळेला नव्या पाच खोल्या मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांच्या वतीने अर्ज करण्यात आला आहे. वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर एका वर्षाने एक खोली मंजूर करण्यात आली. धोकादायक अवस्थेत असलेल्या या शाळेमुळे विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शाळा बंद करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य हिराचंद पवार, सरपंच साधिका पवार, शाळा समितीच्या अध्यक्षा रेखा पवार यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा