झोपडीला आग लागल्याने चिमुकली गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:07+5:302021-04-01T04:41:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मार्केट यार्ड येथील शेतकरी मंडई परिसरात एका झोपडीला आग लागून त्यामध्ये सहा वर्षीय मुलगी ...

झोपडीला आग लागल्याने चिमुकली गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मार्केट यार्ड येथील शेतकरी मंडई परिसरात एका झोपडीला आग लागून त्यामध्ये सहा वर्षीय मुलगी ८९ टक्के भाजून जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किस्मत भोसले हा पारधी समाजाचा व्यक्ती सातारा येथील शेतकरी मंडई परिसरात एका झोपडीमध्ये आपल्या दोन मुलांसह वास्तव्य करतो. बुधवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास आपल्या मुलांना जेवण करून तो कामानिमित्त बाहेर गेला. मुलगी पंची किस्मत भोसले (वय ६) ही झोपडीत झोपली असताना अचानक झोपडीला आग लागली. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंची भोसले ही ८९ टक्के भाजली असल्याने तिला तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.