वेदशास्त्र संवर्धनसाठी मुलांचा पुढाकार

By Admin | Updated: March 16, 2015 00:13 IST2015-03-15T22:29:11+5:302015-03-16T00:13:48+5:30

खाऊच्या पैशातून निधी : शिवाजी माध्यमिक शाळेचा उपक्रम

Child's Initiative for the Promotion of Vedas | वेदशास्त्र संवर्धनसाठी मुलांचा पुढाकार

वेदशास्त्र संवर्धनसाठी मुलांचा पुढाकार

कऱ्हाड : येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वतीने वेदशास्त्र संवर्धन मंडळाच्या इमारतीसाठी १४ हजार ४७५ रुपयांचा धनादेश देण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष हरिकृष्ण घळसासी यांनी हा धनादेश स्वीकारला.
शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांच्या प्रेरणेने हा धनादेश मुख्याध्यापिका आर. जी. शेख यांच्या हस्ते देण्यात आला. इमारत निधीसाठी विठामाता विद्यालय पाच हजार रुपये, मसूरच्या शिवाजी विद्यालयाकडून तीन हजार पाचशे, कार्वेतील शिवाजी विद्यालयाकडून दोन हजार पाचशे रुपये, कऱ्हाडच्या शिवाजी विद्यालयाकडून दोन हजार ४७५, महाराष्ट्र हायस्कूलतर्फे पाचशे व देशभक्त भिकोबा आप्पाजी साळुंखे महाविद्यालय किवळ यांच्याकडून पाचशे रुपये असा एकूण १४ हजार ४७५ रुपयांचा धनादेश देण्यात आला. या निधी संकलनासाठी विश्रांती देसाई, एस. एस. कुलकर्णी, टी. आर. सय्यद, व्ही. आर. पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. आर. ए. थोरात यांनी सूत्रसंचालन केले. यू. डी. देसाई यांनी आभार मानले. पर्यवेक्षिका एस. बी. जगदाळे, एस. बी. देसाई, एम. पी. कदम, आर. बी. बुराडे, व्ही. यू. साळुंखे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Child's Initiative for the Promotion of Vedas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.