शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
12
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
13
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
14
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
15
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
16
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
17
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
18
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
19
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

मुलांची गंमत पालकांच्या अंगलट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

कऱ्हाड : ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या मोबाईलवरून मुलाने फोन करून हॉटेलमध्ये अतिरेकी घुसल्याचे सांगितले आणि मुंबईसह कऱ्हाडातही खळबळ उडाली. मुलाचा ...

कऱ्हाड : ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या मोबाईलवरून मुलाने फोन करून हॉटेलमध्ये अतिरेकी घुसल्याचे सांगितले आणि मुंबईसह कऱ्हाडातही खळबळ उडाली. मुलाचा हा खोडसाळपणा पालकांच्या चांगलाच अंगलट आला. मुलांकडून मोबाईलच्या होणाऱ्या गैरवापराचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यापूर्वीही अनेक मुलांनी अशी ‘गंमत’ करून पालकांचा जीव टांगणीला लावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.

मोबाईलविषयी मुलांना असलेलं प्रचंड आकर्षण नवीन नाही. पालकांच्या हातात मोबाईल दिसला की, तो मिळविण्यासाठी पूर्वी मुलं हट्ट धरायची. रुसून बसायची; पण ‘ऑनलाइन’ शिक्षणाने त्यांची ही हौस पुरवली. शिक्षणासाठी मुलांच्या हातात ‘स्मार्ट’ फोन आले. मोबाईलद्वारे मुलांनी अभ्यासाचे धडेही गिरवले. मात्र, अभ्यासापेक्षा मोबाईलचा अनेकवेळा अवांतर वापर होत असल्यामुळे पालकही चिंतेत आहेत. मोबाईल द्यावा तर मनमानी वापराची चिंता आणि नाही द्यावा तर अभ्यास कसा होणार, हा प्रश्न. त्यामुळे पालक दुहेरी मनस्थितीत अडकल्याचे दिसते.

तासभर अभ्यास आणि दिवसभर ‘टाइमपास’ असा प्रकार अनेक वेळा मुलांकडून होतो. पालकांनी मोबाईलचा इतर कारणासाठी वापर न करण्याबाबत अनेक वेळा सांगूनही काही मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकांचे दुर्लक्ष होताच त्यांच्याकडून मोबाईलचा मनमानी वापर सुरू होतो. सध्या काही मुलांना मोबाईलची एवढी सवय झाली आहे की, दिवसभर ते त्यामध्ये गुरफटून गेल्याचे दिसते. अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलचा वापर करू नको, असे पालक वारंवार आपल्या मुलांना सांगतात. मात्र, काही मुले वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशनच्या आकर्षणामुळे मनमानीपणे मोबाईलचा वापर करतात. आणि ही बाब पालकांसाठी चिंतेची आहे.

- चौकट

वेगवेगळ्या ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ची भुरळ

मोबाईलमध्ये असणारी वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स मुलांना भुरळ घालतात. कार्टुन, गेम, छोटे व्हिडीओ पाहताना मुले हरखून जातात. त्यामुळे त्यांना अभ्यासाचं भान राहत नाही. परिणामी, मोबाईल मुलांसाठी एकप्रकारचे खेळणेच बनला आहे.

- चौकट (फोटो : २७केआरडी०२)

अभ्यासाव्यतिरीक्त मुलांचा मोबाईल वापर

गेम : ३८ टक्के

कॉल : २४ टक्के

व्हिडीओ : १८ टक्के

चित्रपट : १२ टक्के

इतर : ८ टक्के

- चौकट

पालकांनी काय कराव..?

१) अभ्यासावेळीच मुलगा, मुलीच्या हाती मोबाईल द्यावा.

२) मोबाईलवर अभ्यासच सुरू आहे का, हे तपासावे.

३) ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ कोणकोणती आहेत, हे पहावे.

४) गरजेव्यतिरीक्त इतर ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ला ‘सेक्युरिटी पिन’ टाकावा.

५) ‘सर्च इंजिन’ला ‘सेफ सर्च’चा पर्याय निवडावा.

- चौकट

मानसिकतेवर होतोय परिणाम

मोबाईल जेवढा फायदेशिर तेवढाच धोकादायक असतो. ‘ब्राऊजर’वर आॅनलाईन सर्च करताना अनेक विकल्प मुलांसमोर येतात. ते विकल्प योग्य आहेत की नाही, याची कसलीच माहिती मुलांना नसते. मात्र, त्यांच्याकडून वेगवेगळी ‘वेबपेज’ उघडली जातात. त्यामुळे संबंधित ‘साईट’वर असणाºया ‘कंटेन्ट’मुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो.

फोटो : २७केआरडी०१

कॅप्शन : प्रतिकात्मक