ऊसतोड कामगारांच्या मुलांना मायेची उब

By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T21:08:52+5:302014-12-09T23:23:39+5:30

कोटेश्वर मंडळाचा उपक्रम : चिमुकल्यांना दिले ४२५ ड्रेस

The children of the underworld | ऊसतोड कामगारांच्या मुलांना मायेची उब

ऊसतोड कामगारांच्या मुलांना मायेची उब

वाई : ऐन थंडीत पालकांबरोबर ऊसतोडणीसाठी आलेल्या चिमुकल्यांना तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर पंचक्रोशी सेवा मंडळाच्यावतीने ड्रेसचे वाटप करण्यात आले. सुमारे ४२४ ड्रेसचे वितरण मंडळाच्यावतीने करण्यात आले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुर्इंज, किसन वीरनगर येथे तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर पंचक्रोशी सेवा मंडळ, गोवे चे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव बागल यांचे संकल्पनेतून किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्यातील ऊस तोड कामगार व हमाल कामगार यांचे मुलांना वय वर्षे २ ते १२ पर्यंत प्रत्येकी २ ड्रेसचे किसन वीर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अमोल जाधव, सतीश जाधव, देवेंद्र जाधव, दत्तात्रय जाधव, धनाजी जाधव, गुलाब कदम, नारायण बल्लळा, यमुना हेंद्रे इत्यादींनी सहकार्य केले.
यावेळी विजय वाबळे म्हणाले की, तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर पंचक्रोशी सेवा मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य व सातारा जिल्ह्यामध्ये एक नवीन क्रांतिकारक इतिहास नोंदविणारा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The children of the underworld

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.