पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: May 13, 2014 00:30 IST2014-05-13T00:30:11+5:302014-05-13T00:30:11+5:30
वेणेखोल येथील घटना : पाच तासांनंतर उरमोडी जलाशयात मृतदेह सापडला

पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
परळी : गावातील मुलांबरोबर उरमोडी जलाशयात पोहायला गेलेल्या अल्पेश राजेंद्र मोरे (वय ९) या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास घडली. अल्पेश आईवडिलांसोबत मुंबई (डोंबिवली) येथे वास्तव्यास आहे. त्यांचे मूळगाव सायळी आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या भावकीतील एकाचे लग्न होते. त्यासाठी सर्वजण गावी आले आहेत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर अल्पेश आईबरोबर वेणेखोल येथे राहणार्या मामाकडे गेला. दरम्यान, रविवारी दुपारी अल्पेश वेणेखोल गावातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळून झाल्यानंतर सर्व मुले उरमोडी जलाशयात पोहण्यासाठी उतरली. अल्पेशला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो जलाशयाच्या काठावर उभे राहून स्वत:च्या अंगावर पाणी मारत होता. विवाहादिवशीच युवतीची गळफास घेऊन आत्महत्या ढेबेवाडी : बागलवाडी-काढणे (ता. पाटण) येथील युवतीने आज (सोमवार) सकाळी विवाहादिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमा वसंत बागल (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलवाडी येथील सीमा बागल या युवतीचा विवाह घारेवाडीतील युवकाशी ठरविण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता. आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी कोळे येथील एका मंदिरात हा विवाह सोहळा होणार होता. बागल कुटुंबीयांकडून विवाहाची तयारी करण्यात आली होती. नातेवाइक व पै-पाहुण्यांना पत्रिकाही पाठविल्या होत्या. रविवारी इतर विधी व गावदेव करण्यात आले. आज सकाळी विवाहस्थळी जाण्यासाठी बागल कुटुंबीयांची गडबड सुरू होती. त्यावेळी सकाळी नऊच्या सुमारास सीमा घरामध्ये नसल्याचे काही नातेवाइकांच्या निदर्शनास आले. नातेवाइकांनी शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेडमध्ये आड्याला तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाइक व ग्रामस्थांनी तिला उपचारार्थ तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.