शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: म्हसवडमधील खासगी डॉक्टरांच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू!, पालकांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 12:01 IST

सहा वर्षांच्या मुलाला जुलाबाचा त्रास होतोय म्हणून म्हसवडमधील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते

म्हसवड : खडकी, ता. माण येथील सहा वर्षांच्या मुलाला जुलाबाचा त्रास होतोय म्हणून म्हसवडमधील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे आमच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांमधून होत आहे. तर याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.सम्यक दत्तात्रय बनसोडे (वय ६, रा. खडकी, ता. माण) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सम्यक बनसोडे याला बुधवारी रात्री जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला उपचारासाठी म्हसवडमधील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर सम्यकच्या वडिलांनी त्यास घरी नेले. सकाळी पुन्हा तोच अन् अधिकचा त्रास सम्यकला होऊ लागल्याने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यास परत एकदा त्याच ठिकाणी उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्या बाळास जुलाबाच्या साध्या आजारातही आपल्या जिवाला मुकावे लागल्याचा आरोप सम्यकच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना केला.आजारी असतानाही आजी, आई - वडील अन् नातेवाइकांसोबत हसून खेळून गप्पा मारणारा सम्यक दवाखान्यात दाखल होईपर्यंत चांगल्या प्रकारे बोलत, गप्पा मारत होता. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार घडताच व संबंधित डॉक्टरानी हे प्रकरण उघडकीस येऊ नये, म्हणून मुलगा मयत असतानाही त्यांच्या नातवाइकांसह पुढील उपचाराचे कारण पुढे करून म्हसवड येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल करण्यास सांगितल्याचेही सम्यकच्या पालकांनी सांगितले.त्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. पुढील उपचाराला सुरुवात करण्याआधीच सम्यकला मृत घोषित करण्यात आले, असे मुलाच्या पालकांनी सांगितले. या प्रकारामुळे नातेवाइकांनी कठोर भूमिका घेत संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी म्हसवड पोलिस ठाण्यात शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत सम्यकच्या मृत्यूची नोंद आकस्मिक म्हणून करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdoctorडॉक्टरDeathमृत्यू