शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: कराडमध्ये उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांचीही तोफ धडाडणार!

By प्रमोद सुकरे | Updated: November 28, 2025 16:35 IST

काँग्रेसचं चाललंय काय..

प्रमोद सुकरेकराड : कराड व मलकापूर नगरपालिकेची निवडणूक दि. २ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी चिन्ह मिळाल्यापासून प्रचाराला मोठी गती आली आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी सायंकाळी कराडला शिंदेसेना आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. तर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, दि. ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभेचे जोरदार नियोजन सुरू आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते नेमके काय काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कराड तालुक्यात कराड व मलकापूर अशा २ नगरपालिका आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण भलतेच तापले असून, महायुती व आघाडीतच बिघाडी झाली आहे. राज्यात महायुती म्हणून एकत्रित काम करणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अशावेळी हे नेते प्रचार सभेमध्ये नेमके काय बोलणार? ते पाहणे महत्त्वाचे आहे.कराडला आमदार अतुल भोसलेंनी भाजपच्या चिन्हावर पॅनल उभे केले आहे तर शिंदेसेनेच्या राजेंद्र यादवांनी स्थानिक आघाडीला प्राधान्य देत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घेऊन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शिवाय काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे. मलकापुरात भाजपने नाट्यमय घडामोडी करत विरोधी नेत्यांनाच भाजपमध्ये घेऊन मोठी खेळी केली. त्यामुळे ६ उमेदवार बिनविरोध करत आमदार भोसलेंनी विजयाचा षटकार मारला आहे. तरी देखील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील यांनी समविचारींना बरोबर घेत इतर जागांवर उमेदवार उभे करत लढत उभी केली आहे.

काँग्रेसचं काय चाललंय..कराड पालिकेत काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह १६ उमेदवार उभे केले आहेत. तर मलकापूरमध्ये केवळ काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढतोय. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तळ ठोकून आहेत. ते कोपरा सभा घेतच आहेत. याशिवाय छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्याही दौऱ्यांचे आयोजन सुरू असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यातून समजते.

मकरंद पाटलांचीही आज सभाअजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी ११ उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर आहेत. तर कराडला फक्त २ ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री मकरंद पाटील यांची सभा शुक्रवार, दि. २८ रोजी मालकापूरला होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Karad Local Elections Heat Up: CM Follows Deputy CM for Rallies!

Web Summary : Karad and Malkapur municipal elections see increased campaigning. Shinde and Fadnavis will rally for their candidates amid intra-alliance competition. Congress focuses on Karad, while NCP's Makrand Patil campaigns in Malkapur.