साताऱ्यातून छत्रपती संभाजीनगर फलक लावूनच एसटी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:05+5:302021-02-08T04:34:05+5:30
सातारा : औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी मनसेने आक्रमक होत आंदोलन केले. तसेच साताऱ्यातील मुख्य बसस्थानकात कार्यकर्त्यांनी एसटीला छत्रपती ...

साताऱ्यातून छत्रपती संभाजीनगर फलक लावूनच एसटी रवाना
सातारा : औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी मनसेने आक्रमक होत आंदोलन केले. तसेच साताऱ्यातील मुख्य बसस्थानकात कार्यकर्त्यांनी एसटीला छत्रपती संभाजीनगर असा फलक लावला. त्यानंतर एसटी रवाना झाली.
मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, अॅड. विकास पवार, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सातारा बसस्थानकातून औरंगाबादला जाणाऱ्या एसटीला छत्रपती संभाजीनगर असा फलक लावला.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली शिंदे, राजेंद्र बावळेकर, सागर बर्गे, अविनाश दुर्गावळे, संजय गायकवाड, समीर गोळे, शिवाजी कासुरडे, निखिल कुलकर्णी, प्रतीक माने, विनय गुजर, रोहित शिंगरे, श्याम बावळेकर, दिनेश धनावडे, राणी शिंगरे, सोनाली कांबळे, शुभम विधाते, अमर महामूलकर, सुयोग जाधव, सुजित पवार, संजय शिर्के, संजय सोनावणे, मयूर नळ, भरत रावळ, वैभव वेळापुरे, दिलीप सोडमिसे, अझहर शेख, गणेश पवार, चैतन्य जोशी आदी उपस्थित होते.
................................................