खंडाळाच्या मुख्याधिकारीपदी चेतन कोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST2021-09-21T04:44:16+5:302021-09-21T04:44:16+5:30

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी पदभार स्वीकारला. नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, गटनेते अनिरुद्ध गाढवे ...

Chetan Konde as the head of Khandala | खंडाळाच्या मुख्याधिकारीपदी चेतन कोंडे

खंडाळाच्या मुख्याधिकारीपदी चेतन कोंडे

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी पदभार स्वीकारला. नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, गटनेते अनिरुद्ध गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांची प्रशासकीय बदली झाल्याने खंडाळा येथील पद रिक्त झाले होते. या जागेवर मुख्याधिकारी चेतन कोंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नगरपंचायतीचा कार्यभार स्वीकारला. नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, गटनेते अनिरुद्ध गाढवे यांनी स्वागत केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय गाढवे, नगरसेवक साजिद मुल्ला, युवराज गाढवे, योगेश गाढवे, राहुल गाढवे, संतोष जाधव, भानुदास गाढवे, चंद्रकांत पवार, बबलू चौधरी उपस्थित होते.

यावेळी कोंडे म्हणाले, ‘खंडाळा शहरातील मंजूर विकासकामे पूर्ण करण्यासह उर्वरित विकासकामे मार्गी लावणे, विस्तारित शहराचा समावेश नगरपंचायत हद्दीत करणे यासह आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.’

फोटो २०खंडाळा

खंडाळाच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार चेतन कोंडे यांनी सोमवारी स्वीकारला. नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, अनिरुद्ध गाढवे यांनी स्वागत केले. (छाया : दशरथ ननावरे)

Web Title: Chetan Konde as the head of Khandala