स्वकर्तृत्व तपासा, मगच चव्हाणांवर टीका करा

By Admin | Updated: October 8, 2014 23:03 IST2014-10-08T22:28:16+5:302014-10-08T23:03:09+5:30

सतेज पाटील यांचा विरोधकांना टोला

Check self-determination, then criticize Chavan | स्वकर्तृत्व तपासा, मगच चव्हाणांवर टीका करा

स्वकर्तृत्व तपासा, मगच चव्हाणांवर टीका करा

कऱ्हाड : ‘पृथ्वीराज चव्हाण यांची उंची अन् कर्तृत्वही मोठे आहे़ पण, दक्षिणेतील काही उमेदवार चव्हाणांवर टीका करीत सुटलेत़ त्यांनी आपले स्वकर्तृत्व तपासावे अन् मगच चव्हाणांवर टीका करावी,’ असा टोला माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विरोधकांना लगावला़
कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, स्मिता हुलवान, श्रीकांत मुळे, संगीता देसाई, शीतल वायदंडे, शारदा जाधव, आनंदराव लादे, फारुक पटवेकर, अशोक पाटील, भीमराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते़
सतेज पाटील म्हणाले, ‘राज्यात एकदा युतीच्या हातात सत्ता देऊन जनतेने अनुभव घेतला आहे़ भूलथापा मारून त्यांनी सत्ता मिळवली; पण अपेक्षापूर्ती केली नाही़ आज हेच गडकरी महाराष्ट्राचा गड पुन्हा मिळविण्याच्या वल्गना करतात़ कऱ्हाडात येऊन येथील भूमिपुत्रावर टीका करतात; पण मतदानाच्या रूपाने येथील जनता गडकरींच्या टीकेला उत्तर देईल,’ असा विश्वास वाटतो़
कऱ्हाड हे शहर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे़ त्यांच्या राज्याचे तुकडे करण्याचा डाव काही मंडळींनी घातला आहे़ पण, यशवंत विचाराचे पाईक तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत़
यावेळी फारुक पटवेकर, अप्पा गायकवाड, राजेंद्र यादव आदींची भाषणे झाली़ (प्रतिनिधी)

Web Title: Check self-determination, then criticize Chavan