नोकरी लावण्याच्या बहाण्याने विरारच्या भामट्याकडून फसवणूक
By Admin | Updated: June 22, 2017 13:22 IST2017-06-22T13:22:23+5:302017-06-22T13:22:23+5:30
कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नोकरी लावण्याच्या बहाण्याने विरारच्या भामट्याकडून फसवणूक
आॅनलाईन लोकमत
कोरेगाव (जि. सातारा), दि. २२ : मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या विरार, जि. पालघर येथील शिवप्रसाद यादव याच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भीष्मराज दत्तात्रय भूतकर यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा ऋषिकेश भूतकर याला शासकीय नोकरी देण्याचे आमिष शिवप्रसाद यादवने दाखविले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून १३ एप्रिल २०१६ रोजी ३० रुपये तर १२ मे २०१६ रोजी २० हजार रुपये यादवच्या विरार येथील बँक खात्यात वर्ग केले होते. पैसे देऊनही यादव नोकरीबाबत काहीच सांगत नव्हता. त्यानंतर यादवने फोन घेणेही बंद केले.
दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच भूतकर यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हवालदार राजू बागवान तपास करीत आहेत.