पाठलाग करून दोन वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:03 IST2017-07-22T15:03:06+5:302017-07-22T15:03:06+5:30
बेकायदा करत होते वाळूची वाहतूक

पाठलाग करून दोन वाहने पकडली
आॅनलाईन लोकमत
फलटण (जि. सातारा), दि. २२ : तरडगाव आणि सालपे (ता.फलटण) येथे विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून महसूल कार्यालयाने दोन्ही वाहने जप्त केली. ही कारवाई सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली.
तरडगाव येथील राहुल गायकवाड यांचा ट्रॅक्टर ट्रेलर एक ब्रास वाळू आणि सालपे तलाव येथे चार ब्रास वाळूची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तलाठी शिवाजी अडसूळ, संतोष नाबर, प्रल्हाद गायकवाड, सोमनाथ पंडित, चालक बाळासाहेब भिसे, मंडल अधिकारी विलास जोशी यांनी या दोन्ही वाहनांचा पाठलाग सुरू केला.
काही अंतर पाठलाग केल्यानंतर ही दोन्ही वाहने पकडण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. ही जप्त केलेली वाहने लोणंद पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. ही कारवाई प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.