चारुकेशी चव्हाण हिला विशेष कला पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST2021-04-12T04:36:03+5:302021-04-12T04:36:03+5:30

वाई : येथील किसन वीर महाविद्यालयात शिकत असलेली चारुकेशी चव्हाण या विद्यार्थिनीला कला व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ...

Charukeshi Chavan gets special art award | चारुकेशी चव्हाण हिला विशेष कला पुरस्कार जाहीर

चारुकेशी चव्हाण हिला विशेष कला पुरस्कार जाहीर

वाई : येथील किसन वीर महाविद्यालयात शिकत असलेली चारुकेशी चव्हाण या विद्यार्थिनीला कला व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या वर्षीचा शिवाजी विद्यापीठ व केंट क्लब कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात येणारा ‘शहीद तुकाराम ओंबळे’ विशेष कला, साहित्य व सांस्कृतिक पारितोषिक जाहीर झाले. रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इंद्रधनुष्य, पश्चिम विभागीय, राष्ट्रीय युवा महोत्सव, तसेच राष्ट्रीय कवाली स्पर्धैत चारुकेशीने सहभाग नोंदवून शिवाजी विद्यापीठाच्या सांस्कृतिक संघात सर्वांपेक्षा जादा गुण प्राप्त केल्याबद्दल या पारितोषिकासाठी तिची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांनी कला व सांस्कृतिक क्षेत्रात महाविद्यालयाचा असणारा लौकिक उंचावण्याची कर्तबगारी चारूकेशीने पार पाडली, या शब्दात तिचे काैतुक केले.

Web Title: Charukeshi Chavan gets special art award