पर्यावरण संवर्धनासाठी म्हसवडमध्ये चार्जिंग स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:50+5:302021-02-07T04:35:50+5:30
म्हसवड : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत ‘स्वच्छ म्हसवड, सुंदर म्हसवड’ स्पर्धेत म्हसवड पालिका उतरली ...

पर्यावरण संवर्धनासाठी म्हसवडमध्ये चार्जिंग स्टेशन
म्हसवड : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत ‘स्वच्छ म्हसवड, सुंदर म्हसवड’ स्पर्धेत म्हसवड पालिका उतरली आहे. स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी इंधनाची बचत करून विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा. पर्यावरण संवर्धनासाठी म्हसवड पालिकेने विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या चार्जिंग स्टेशनचे पालिका इमारतीत व बसस्थानक चौकात नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, उपनगराध्यक्ष धनाजी माने, मुख्याधिकारी सचिन माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक विजेवर चालणारी चारचाकी व दुचाकी वाहनांचे प्रदर्शन व ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटनावेळी नगराध्यक्ष वीरकर, उपनराध्यक्ष धनाजी माने, गणेश रसाळ, पृथ्वीराज राजेमाने, सुरेश पुकळे, धर्मराज लोखंडे, अनिल माने, गणेश चव्हाण राजकुमार डोंबे, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक मोरे, सागर सरतापे आदी उपस्थित होते.
(कोट..)
विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवून इंधन बचतीचा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला. तर ही वाहने चार्जिंग करण्यासाठी पालिकेत एक चार्जिंग स्टेशन सुरू केले असून, लवकरच शहरात तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या अभियानात हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी म्हसवड पालिकेतर्फे हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
-डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी