दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:19+5:302021-03-23T04:42:19+5:30

संगीता मोहन घोलप (रा. चरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या तनुजा शेख ...

Charge filed against a woman selling liquor | दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

संगीता मोहन घोलप (रा. चरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या तनुजा शेख यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चरेगाव येथे बिअर बारच्या आडोशाला देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीनुसार सहायक फौजदार माने, हवालदार घाडगे, कॉन्स्टेबल शिंदे यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता एक महिला देशी दारूचे बॉक्स घेऊन बसलेली दिसून आली. पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ हजार १४४ रुपये किमतीच्या देशी दारूच्या ४४ बाटल्या तसेच २ हजार ६०० रुपये किमतीच्या १०० बाटल्या असा मिळून ३ हजार ७४४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संगीता घोलप या महिलेस ताब्यात घेतले आहे. याबाबतची नाेंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Charge filed against a woman selling liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.