शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्यावर हुल्लडबाजी, २० पर्यटकांवर पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:40 IST

सडावाघापुर येथील उलटा धबधब्यावर वर्षापर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

हणमंत यादवचाफळ : गत दोन वर्षीपासुन कोरोना पार्श्वभूमीवर बंद असणारा सडावाघापुर येथील उलटा धबधबा यावर्षीपासून पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. वर्षापर्यटनासाठी याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या २० पर्यटकांवर चाफळ पोलिसांनी कारवाई केली. चाफळ विभागातील दाढोली - गमेवाडी - चाफळ रस्त्यावर नाकाबंदी करत पोलिसांनी हुल्लडबाज पर्यकांवर दंडात्मक कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड वसुल केल्याची माहिती पोलीस अंमलदार सिध्दनाथ शेडगे यांनी दिली.सडावाघापूर येथील उंच डोंगर पठारावर उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी होत आहे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना काही पर्यटक हुल्लडबाजी करत आहेत. गत दोन वर्षीपासुन कोरोना पार्श्वभूमीवर बंद असणारा हा उलटा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी परिसरात पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, रिमझिम पावसात काही पर्यटक मद्यपान करुन बेभान होवून दुचाकी गाड्या पळवत आहेत. याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.या हुल्लडबाज पर्यटकांवर चाफळ पोलिसांनी मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई यापुढे अशीच सुरु राहणार आहे.

पर्यटकांनी जरुर या निसर्गाच्या अदभूत परिसराचा आनंद घ्यावा. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग न करता या पर्यटन पढंरीत वावरावे. जर कोणी हुल्लडबाजी केली तर त्यांच्यावर कारवाई करु. - सिध्दनाथ शेडगे, ठाणे अंमलदार चाफळ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनPoliceपोलिस