शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

होमगार्डकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:17 IST

कोरोनाविरोधातील लढा हा सर्वांनाच अतिशय काळजीनं अन् घरात राहूनच लढावा लागणार आहे. लोकांनी घरात बसून राहणं महत्त्वाचं आहे. प्रशासनाच्या सूचनांचं प्रत्येक नागरिकांना यथोचित पालन केलं तर कोरोनाशी लढा यशस्वी होऊ शकतो. - प्रमोद पाटील, केंद्र नायक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड, सातारा

ठळक मुद्देकोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासकीय योद्धे

दत्ता यादव ।सातारा : कोरोना महामारीविरोधातील युद्धात प्रशासनाचे कसब पणाला लागलेले आहे. अनेक अडचणी येतायत, त्यातच पोलीस अन् होमगार्डवर हल्ले होतायत. जे पोलिसाला अधिकार आहेत, तेच अधिकार होमगार्डस्ना पण आहेत. त्यामुळे होगगार्डकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन होमगार्ड आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. जिल्ह्यात सध्या ४९५ होमागार्ड तैनात असून, त्यांच्या सुरक्षिततेची कशाप्रकारे काळजी घेतलीय यासंदर्भात जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील केंद्र नायक प्रमोद पाटील यांच्याशी केलेली बातचित...ा्रश्न : होमगार्डची सध्या नेमकी कशी काळजी घेतली गेलीय?उत्तर : पूर्वी होमगार्डला जिल्ह्यात कुठेही ड्यूटी दिली जात होती. मात्र, कोरोनामुळे यात बदल करण्यात आलाय. ज्या ठिकाणी होमगार्ड राहत आहे. त्याच ठिकाणी त्याला ड्यूटी दिली गेली आहे. जेणेकरून त्याचा प्रवास वाचेल. हॅन्ड सॅनिटायझर, मास्क अशा प्रकारची सुरक्षिततेची साधनेही त्यांना देण्यात आली आहेत. घरात गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांसोबत होमगार्डस्सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहेत.

प्रश्न : या परिस्थितीत लोकांना काय आवाहन कराल?उत्तर : आपली सर्व गावे निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. बंदोबस्तावर असताना लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला जात आहे. हे काम आयुष्यभर आठवणीत राहणारे असेच आहे. सर्व लोकांनी पोलीस आणि होमगार्डस् सहकार्य करावे. हे योद्धे आपल्या आरोग्यासाठी खूप काळजी घेत आहेत.

प्रश्न : किती होमगार्ड सध्या तैनात आहेत?उत्तर : सध्या १४४३ होमगार्ड आहेत. यापैकी ५०० होमगार्डची मागणी झालीय; पण सध्या ४९५ कार्यरत आहेत. प्रशासनाच्यावतीने मागणी केल्यास आणखी उपलब्ध होतील.

चारजणांवर भार..जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या एक अधिकारी आणि तीन कर्मचारी आहेत. या केवळ चार कर्मचाऱ्यांवर संपूर्ण जिल्ह्याचा भार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्यात होमगार्ड काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कार्यालयीन कामावर परिणाम होत आहे. या कार्यालयासाठी १७ जागा रिक्त आहेत. मात्र, अद्याप या जागा भरल्या गेल्या नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

मदतीचा ओघ वाढतोयहोमगार्डना काय अधिकार आहेत, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे हा काय होमगार्ड करणार, असे समजून अनेकजण होमगार्डस् अपमानास्पद आणि पोलिसांपेक्षा वेगळी वागणूक देतायत. मात्र, ज्यावेळी होमगार्डपण कायद्याने चालतो. तेव्हा मग लोक गयावया करतात. होमगार्डच्या पदावर जाऊ नका, हा होमगार्डही तुमच्या सेवेसाठीच रस्त्यावर अहोरात्र लढत आहे. ते सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असतात. त्यांना मदत करा, असेही पाटील यांनी आवाहन केले आहे.

संडे स्पेशल मुलाखत

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस