शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: मलकापुरातील उड्डाण पूल पाडण्यासाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या नवा वाहतूक मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 12:40 IST

एकेरी वाहतुकीमुळे रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी वाहने पार्क करता येणार नाहीत

माणिक डोंगरेमलकापूर : येथील कृष्णा हॉस्पिटलसमोर असणारा उड्डाणपूल पाडण्याची तयारी झाली आहे. सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून महामार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत. पूल पाडण्याचे काम बुधवारी रात्रीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे साताऱ्याहून कोल्हापूरकडे व कोल्हापूरहून साताऱ्याकडे मलकापूर उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक बुधवारी रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती डी. पी. जैन कंपनीचे अधिकारी सत्येंद्रकुमार वर्मा यांनी दिली.वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडे जाणारी जड वाहतूक भादी हार्डवेअर येथील यू-टर्नऐवजी कोल्हापूर नाकामार्गे ढेबेवाडी फाटा येथे यू-टर्न घेऊन कोल्हापूर नाकामार्गे वारुंजी फाट्यावरील ओव्हरब्रीजवरून सातारा बाजूकडे जातील. हायवेवरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक अक्षता मंगल कार्यालय येथून सेवारस्त्यावर येऊन गंधर्व हॉटेलपासून सेवारस्त्याने जाऊन पुन्हा हायवेला मिळतील. कोल्हापूर ते साताराकडे जाणारी वाहने कोयना औद्योगिक वसाहत समोरून सेवारस्त्यावर येऊन सरळ सेवारस्त्याने जाऊन पंकज हॉटेलच्या पश्चिम बाजूस हायवेला मिळतील व तेथून कोयना नदीवरील पुलावरून साताऱ्याकडे जातील. यापूर्वीचा भादी हार्डवेअरसमोरील यू-टर्न रद्द करण्यात येत आहे. ढेबेवाडी फाट्याच्या उत्तरेस असलेला व मलकापूर फाटा येथील असलेला लहान भुयारी मार्ग बंद करण्यात येईल. यापूर्वीच्या अधिसूचनेप्रमाणे वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल व कोयना औद्योगिक वसाहत ते वारुंजी फाट्यापर्यंत एकेरी वाहतूक राहील व या रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी वाहने पार्क करता येणार नाहीत. ढेबेवाडी फाटा व कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील उड्डाण पुलाखालचा मार्ग खुला राहील. वाहतूक मार्गातील बदलासाठी सर्व नागरिकांनी नोंद घेऊन पोलिस दलास सहकार्य करावे, असे आवाहन कऱ्हाड वाहतूक नियंत्रण शाखा, डी. पी. जैन कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर