वीज मीटरमध्ये फेरफार तर घरात कायमचा अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:41 IST2021-08-27T04:41:42+5:302021-08-27T04:41:42+5:30

स्टार १०९६ सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वीज बिल कमी यावे, म्हणून काही ग्राहक वीज मीटरमध्ये फेरफार ...

Change in electricity meter but permanent darkness in the house! | वीज मीटरमध्ये फेरफार तर घरात कायमचा अंधार !

वीज मीटरमध्ये फेरफार तर घरात कायमचा अंधार !

स्टार १०९६

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वीज बिल कमी यावे, म्हणून काही ग्राहक वीज मीटरमध्ये फेरफार करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वीज वितरण कंपनीने अशा लोकांवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात ४९२ ठिकाणी वीज चोरी आढळून आली असून वीज चोरी करणाऱ्यांकडून ३७ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्याच्या २५ दिवसांमध्ये तब्बल ४ लाख ४ हजार ७३ युनिटची चोरी प्रशासनाने उघडकीस आणली. आता वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. कुठल्याही क्षणी वीज विभागाचे पथक ही कारवाई करत आहे. यासाठी खबऱ्यांचे नेटवर्कदेखील कामाला लावण्यात आलेले आहे. विशेषत: १ ते ३० युनिटच्या आत वीज वापर होत असलेल्या मीटरची तपासणी करण्यात येणार आहे. मीटरचे सील तोडले असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विजेच्या बिलाव्यतिरिक्त मोठ्या रकमेचा दंड आकारण्यात येत आहे. हा दंड जर १५ दिवसात भरला नाही तर संबंधित वीज चोरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

१) वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

२०१९ - १९५

२०२० - ४६६

२०२१ (ऑगस्टपर्यंत) - ४९२

२) मीटरजप्ती अन् ५० हजारांपर्यंत दंड

मीटरमध्ये फेरफार केल्यास

मीटरमध्ये फेरफार केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. वीजबिलाच्या दीडपट दर लावून दंड केला जातो. विजेचे बिलही वेगळे वसूल केले जाते.

३) कधीही होऊ शकते आपल्या मीटरची तपासणी

मोठा बंगला आहे. फॅन, कुलर, गिझर, वॉशिंग मशीन, पार्किंग लाईट्स सुरू ठेवल्या तरी ३० युनिटच्या आतच महिन्याचे बिल असेल तर ते शंकास्पद ठरू शकते. प्रशासनाचा यावर वॉच आहे. जर लोकांनी याप्रकारे फसवणूक केली तर कुठल्याही क्षणी मीटरची तपासणी केली जाऊ शकते.

४) महावितरण अधिकाऱ्याचा कोट

जिल्ह्यातील कमी युनिटचे बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या मीटरवर प्रशासनाचा वॉच आहे. जे चोरुन वीज वापरतात त्यांच्याविरोधात पोलीस कारवाईदेखील केली जाऊ शकते. तसेच अशा लोकांची नावेही जाहीर केली जातील.

गौतम गायकवाड,

अधीक्षक अभियंता वीज वितरण

Web Title: Change in electricity meter but permanent darkness in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.