कोठडीतून पळालेल्या चंद्रकांतच्या मुंबईत मुसक्या आवळल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 14:08 IST2017-10-03T14:03:10+5:302017-10-03T14:08:00+5:30

सातारा शहर पोलिस ठाण्यातील कोठडीच्या स्वच्छतागृहातून फरार झालेल्या चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे याच्या मुसक्या पुन्हा सातारा पोलिसांनी आवळल्या आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याला मुंबईत येथे पकडण्यात आले असून, याला पोलिस अधिकाºयांनीही दुजोरा दिला आहे.

Chandrakant, who escaped from custody, got cheated in Mumbai ... | कोठडीतून पळालेल्या चंद्रकांतच्या मुंबईत मुसक्या आवळल्या...

सातारा पोलिस ठाण्यातून फरार झालेल्या चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

ठळक मुद्देसातारा पोलिसांचा दुजोरासातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून झाला होता फरार शोधासाठी पोलिसांची विविध पथके झाली होती रवाना सोमवारी रात्री पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा, दि. ३ : सातारा शहर पोलिस ठाण्यातील कोठडीच्या स्वच्छतागृहातून फरार झालेल्या चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे याच्या मुसक्या पुन्हा सातारा पोलिसांनी आवळल्या आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याला मुंबईत येथे पकडण्यात आले असून, याला पोलिस अधिकाºयांनीही दुजोरा दिला आहे.


 सुमारे सहा दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने लोणंद, ता. खंडाळा येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून मिरची पूडसह नॉयलॉन दोरी, मोबाईल, दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. तसेच दरोड्याच्या तयारीत असणाºया चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१, रा. ढवळ, ता. फलटण. सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) यालाही पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली होती. तो सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत होता.

यादरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याला व अन्य एका संशयिताला पोलिस कोठडीत असणाºया स्वच्छतागृहात नेण्यात आले होते. त्यावेळी चंद्रकांत लोखंडे स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूची लाकडी खिडकी मोडून व गज वाकवून पसार झाला होता.

त्यामुळे पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली होती. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली होती. मात्र, दोन दिवस त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. असे असतानच सोमवारी रात्री त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला साताºयाला आणण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिकाºयांनी दिली.  चंद्रकांत लोखंडे हाती लागल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: Chandrakant, who escaped from custody, got cheated in Mumbai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.