शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

चंद्रकांत लोखंडेच्या टोळीला मोक्का, सातारा पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पसार झाल्याप्रकरणीही गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 6:28 PM

राज्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, अत्याचार असे गुन्हे नोंद असणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काच्या प्रस्तावास मंजुरीही दिली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चंद्रकांत लोखंडे पळून गेला होता. याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.

ठळक मुद्देविविध पोलिस ठाण्यात तक्रारी गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती विश्वास नांगरे-पाटील यांची मोक्काच्या प्रस्तावास मंजुरी

सातारा: राज्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, अत्याचार असे गुन्हे नोंद असणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काच्या प्रस्तावास मंजुरीही दिली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चंद्रकांत लोखंडे पळून गेला होता. याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २७ एप्रिल २०१७ रोजी शिरवळमध्ये महिलेच्या गळ्यातून दागिने हिसकावण्याची घटना घडली होती. शिरवळच्या केदारेश्वर मंदिराजवळ दुचाकीवरून अनोळखी तिघेजण आले होते. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अनोळखीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातून सोन्याचे गंठण हिसकावून नेले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व पथकाने उघडकीस आणला होता. या गुन्ह्यात चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (मूळ रा. ढवळ, ता. फलटण. सध्या रा. शिरवळ), नीलेश बाळासो निकाळजे (रा. सोनगाव, ता. फलटण) आणि अक्षय शिवाजी खताळ (रा. बिबी, ता. फलटण) हे आरोपी निष्पन्न झाले होते. यातील निकाळजे हा गुरांचा डॉक्टर आहे.

तपासादरम्यान या टोळीच्या विरोधात शिरवळ, लोणंद, फलटण ग्रामीण, खंडाळा, सातारा शहर, सातारा तालुका तसेच मुंबईतील कळंबोली, पनवेल पोलिस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी, अत्याचार, जबरी चोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली होती.विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याने व दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शिरवळचे पोलिस निरीक्षक बी. एन. पाटील यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्याकडे पाठवला होता.

हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फलटणचे पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे हे करणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा