शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

चंदा' है तू, अब 'तारा' भी तू! चांदोली जंगल की 'राणी' है तू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:43 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्याचा उद्देशाने ताडोबा उद्यानातील पकडलेली तरुण वाघीण नुकतीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली येथे सोडण्यात आली.

प्रमोद सुकरे लोकमत न्यूज नेटवर्क

कराड -सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्याचा उद्देशाने ताडोबा उद्यानातील पकडलेली तरुण वाघीण नुकतीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली येथे सोडण्यात आली. हा एक ऐतिहासिक टप्पा या माध्यमातून पूर्ण झाला आहे. पण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडलेली ही वाघीण 'चंदा' की 'तारा' असा प्रश्न अनेकांना पडतोय.पण ही दोन्हीही नावे बरोबरच आहेत. म्हणून तर 'चंदा' है तू ,अब 'तारा' भी तू; चांदोली जंगल की राणी है तू!असे गर्वाने म्हणावे लागते.

खरंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी इतर व्याघ्र प्रकल्पातून वाघ आणणे आवश्यक होते. यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी  प्रयत्नही केले. मग कुठे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येतील ३ नर व ५ मादी अशा ८ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यासाठी मंजुरी दिली.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने खरं तर हा एक महत्त्वाचा टप्पा होता. मग महाराष्ट्र वन विभागाने त्याला 'ऑपरेशन तारा' असे नाव दिले.व्याघ्र संवर्धन उपक्रमा अंतर्गत ताडोबा येथील टी-२०-एस -२ या तरुण वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वीपणे स्थलांतर केले . शुक्रवारपासून या वाघिणीने चांदोली जंगलात मुक्त संचारही सुरू केला आहे. त्यामुळे याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. 

वाघिणीचा २७ तास पिंजऱ्यातून  प्रवास 

ताडोबा येथे बुधवार दि. १२ रोजी दुपारी ही तरुण वाघीण पकडण्याची मोहीम सुरू झाली. तिला ५ वाजता पिंजऱ्यात बंदिस्त केल्यानंतर वैद्यकीय तपासणी पूर्ण करून रात्री १० वाजता तिचा कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला शुक्रवार रात्री १:३० वाजता ती चांदोली येथे दाखल झाली. या दरम्यान तिने तब्बल २७ तास पिंजऱ्यातून प्रवास करत१ हजार किलोमीटरचे अंतर पार केले.

व्याघ्र पर्यटन वाढेल 

राज्य शासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान व भारतीय वन्य जीव संस्था यांच्या एकत्रित सहकार्याने व्याघ्र पुनर्वसन व संवर्धनाची दिशा यामुळे अधिक भक्कम होत आहे. पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता भविष्यात येथे व्याघ्र पर्यटन वाढ होण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते. चांदोली येथे आणलेली ही वाघीण ताडोबा येथून आणली आहे. ती ताडोबामध्ये असताना तिची ओळख 'चंदा'अशी होती. आता ऑपरेशन 'तारा'च्या माध्यमातून तिला इकडे आणल्याने तिला 'तारा' अशी नवीन ओळख देण्यात आली आहे. पण 'चंदा' व 'तारा' ही दोन्ही नावे या एकाच वाघिणीची आहेत.

रोहन भाटेमानद वन्यजीव रक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Chanda is now Tara: Tigress Transferred to Chandoli Sanctuary

Web Summary : A tigress from Tadoba, known as Chanda, has been successfully relocated to Chandoli in Sahyadri Tiger Reserve. This translocation, named Operation Tara, aims to increase the tiger population and boost ecotourism in the region after the tigress traveled 1000 kilometers in 27 hours.