शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Chanda Tigress: ताडोबातून आणलेल्या वाघिणीचा चांदोली जंगलात मुक्तसंचार सुरू-video

By प्रमोद सुकरे | Updated: November 20, 2025 15:21 IST

व्याघ्र संख्या वाढविण्यासाठीचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य 

प्रमोद सुकरे कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढविण्यासाठी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आला. पूर्वी नियंत्रित पिंजरा मध्ये ठेवण्यात आलेली वाघीण (एस टी आर टी -४ )ला दि. १८ रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरीत्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते.

गेली २ दिवस वाघीण त्याच एनक्लोजरमध्ये आत फिरत होती. तिने आतमध्ये शिकार केली होती व ते खाऊन तेथेच आत २ दिवस राहीली. दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही. मात्र पिंजऱ्यातील या वाघिणीचे शुक्रवारी (दि.२१) सकाळी ८ वाजता पिंजरा सोडला अन डौलदारपणे ती जंगलात निघून गेली आहे.

वाचा : चंदा वाघिणीने डरकाळी फोडली, ताडोबातून ८५० किलोमीटरचा प्रवास करुन सह्याद्रीत पोहचलीसदरची वाघिणीच्या चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले.

“वाघिणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शविली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे. ती पूर्णतः तंदुरुस्त असून जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी सिद्ध आहे. आम्ही तज्ञांच्या सहकार्याने वैज्ञानिक व जबाबदार पद्धतीने तिच्या निरीक्षणाचे पुढील टप्पे कार्यान्वित करणार आहोत. हा टप्पा सह्याद्री व्याघ्र पुनर्स्थापना उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.” - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प  

“महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धन कार्यक्रम वैज्ञानिक पद्धतीने व दीर्घकालीन धोरणांनुसार राबविला जात आहे. सदर वाघीण पर्यावरणाशी यशस्वीरीत्या अनुकूल झाली असून नैसर्गिक वर्तनही दिसून येत आहे. तज्ञ पथकाकडून तिचे सतत निरीक्षण होत असल्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना मिळेल.” - एम.एस.रेड्डी,  प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ह्यामुळे सह्याद्री मध्ये भविष्यात टायगर टूरिजम (व्याघ्र पर्यटन) वाढ होण्यास मदत होईल - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Chanda Tigress Roams Free in Chandoli Forest After Tadoba Relocation

Web Summary : Chanda, the tigress from Tadoba, has been successfully released into Chandoli National Park to boost the tiger population. After acclimatization and monitoring, she adapted well and was declared fit. This marks a significant step for tiger conservation efforts in the Sahyadri region.