तंटामुक्त समिती अध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:00+5:302021-09-17T04:47:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सातारारोड-पाडळी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रगतशील शेतकरी संजीवन ...

As the Chairman of the Dispute Resolution Committee | तंटामुक्त समिती अध्यक्षपदी

तंटामुक्त समिती अध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सातारारोड-पाडळी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रगतशील शेतकरी संजीवन फाळके यांची एकमताने निवड करण्यात आली.

सूचक म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य अजित फाळके यांनी संजीवन फाळके यांचे नाव सुचवले. त्याच नीलेश पवार यांनी अनुमोदन दिले. सातारारोड-पाडळी या गावची ग्रामसभा कोरमअभावी रद्द करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेता रद्द झालेली सभा कोरम पूर्ण करून पुन्हा घेण्यात आली. या सभेत संजीवन फाळके यांनी एकमताचे निवड करण्यात आली. या निवडीबद्दल आमदार महेश शिंदे, सरपंच किशोर घाडगे-पाटील, उपसरपंच प्रताप पवार, ग्रामविस्तार अधिकारी डी. एल. सुरवसे प्रकाश फाळके, रत्नदीप फाळके यांच्यासह ग्रामस्थांकडून संजीवन फाळके यांचे कौतुुक करण्यात आले.

फोटो : १६ संजीवन फाळके

Web Title: As the Chairman of the Dispute Resolution Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.