चाफळला कोरोना योद्ध्यांचा सत्कार (कोरोना योद्ध्यांचा उल्लेख बातमीत दिसत नाही.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST2021-05-28T04:28:08+5:302021-05-28T04:28:08+5:30

चाफळ : ‘कोरोना काळात जीवाची बाजी लावत चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी केलेले काम खरोखर प्रशंसनीय असे आहे. ...

Chafala felicitates Corona Warriors (Corona Warriors are not mentioned in the news.) | चाफळला कोरोना योद्ध्यांचा सत्कार (कोरोना योद्ध्यांचा उल्लेख बातमीत दिसत नाही.)

चाफळला कोरोना योद्ध्यांचा सत्कार (कोरोना योद्ध्यांचा उल्लेख बातमीत दिसत नाही.)

चाफळ : ‘कोरोना काळात जीवाची बाजी लावत चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी केलेले काम खरोखर प्रशंसनीय असे आहे. विभागातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सोईसुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी दिली.

चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी ते बोलत होते. चाफळ पंचायत समिती गणाच्या सदस्या रूपाली पवार, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हणमंत यादव, चंद्रकांत देशमुख, चाफळचे उपसरपंच काटे, वैद्यकीय अधिकारी सचिन कुराडे, आरोग्य साहाय्यक राजेंद्र खरात, मकसुद मोमीन, गायकवाड, राजेंद्र राऊत, सचिन साळुंखे, श्रीकांत डोणोलीकर यांची उपस्थिती होती.

कोरोना काळातील योगदानाबद्दल डॉ. कुराडे व राजेश पवार यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी सचिन कुराडे, मंदा माने, धनाजी लोंढे, सचिन साळुंखे उपस्थित होते.

Web Title: Chafala felicitates Corona Warriors (Corona Warriors are not mentioned in the news.)