‘पर्ल्स’ विरोधातील तक्रारींचे ‘शतक’

By Admin | Updated: December 14, 2014 23:47 IST2014-12-14T22:21:52+5:302014-12-14T23:47:40+5:30

स्थानिक गुन्हे शाखा : तक्रारी दाखल करण्याचा आज अंतिम दिवस

'Century' of complaints against Perles | ‘पर्ल्स’ विरोधातील तक्रारींचे ‘शतक’

‘पर्ल्स’ विरोधातील तक्रारींचे ‘शतक’

सातारा : ‘पीएसीएल’ तथा ‘पर्ल्स’च्या विरोधात गेल्या पाच दिवसांत शंभरहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेत तक्रारी दाखल करून घेण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्याचा सोमवार, दि. १५ डिसेंबर शेवटचा दिवस आहे. दरम्यान, वारंवार तक्रारीचा ओघ वाढत असल्यामुळे तक्रारीसाठी आणखी मुदत वाढविण्याची मागणी पुढे आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत दाखल झालेल्या तक्रारी या एमपीएडी अ‍ॅक्टच्या अनुषंगाने दाखल करण्यात येत असून, येथे दाखल झालेल्या तक्रारी साठहून अधिक आहेत. येथे लहुबा विठ्ठल शितोळे (रा. जरेवाडी, ता. कोरेगाव), संतोष रामचंद्र सपकाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण), शंकर पांडुरंग शिंदे (रा. मसूर, ता. कऱ्हाड), प्रेमा बळीराम माळवे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), योगीराज रामचंद्र वारले (रा. मरळी, ता. कऱ्हाड), आनंद दिलीप सावंत (रा. विठ्ठलकृपा कॉलनी, संगमनगर, सातारा) सूरज कोंडिबा सपकाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण), आशा सतीश फरांदे (रा. शनिवार पेठ, सातारा), विठ्ठल दगडू सपकाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण), अशोक बापूसाहेब पवार (रा. भवानी पेठ, सातारा), आनंदा गेणू साबळे (रा. वडूथ, ता. सातारा), अक्षय राजकुमार गांधी (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव), वसंत गणपत सणस (रा. आरडे, ता. जावळी), दत्तात्रय हणमंत माने (रा. कोडोली, सातारा), किशोर विजय जाधव (रा. संभाजीनगर) यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या लोकांनी गुंतवलेली रक्कम ११ लाख इतकी असून, त्यांना परतावा होणारी रक्कम २८.३९ लाख इतकी आहे.
दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेत चार दिवसांत साठहून अधिक तर शाहूपुरी पोलीस ठाण्या चाळीसहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे दाखल झालेल्या तक्रारींचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेद्रे करत आहेत. (प्रतिनिधी)

पाच जणांवर गुन्हे
फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संचालक लोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, बराखांबा रोड, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांच्यासह एजंट, कार्यालय व्यवस्थापक सोनावणे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: 'Century' of complaints against Perles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.