केंद्राने रुग्णसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:40+5:302021-04-01T04:40:40+5:30

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजित पाटील, दक्षिण काँग्रेसचे ...

The center should provide vaccines in proportion to the number of patients: Prithviraj Chavan | केंद्राने रुग्णसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी : पृथ्वीराज चव्हाण

केंद्राने रुग्णसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी : पृथ्वीराज चव्हाण

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजित पाटील, दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितीन थोरात, कराड उत्तरचे अध्यक्ष हेमंत जाधव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, इंद्रजीत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील प्रशासनाची आढावा बैठक घेतली. तालुक्यात कोरोनामुळे आजवर ३५० मृत्यू झाले आहेत. ही बाब दुर्दैवी आहे. तालुक्यातील कोरोनाचा आलेख जर वाढला तर चिंताजनक होईल. सध्या तालुक्यात बेडची उपलब्धता चांगली आहे. रुग्णसंख्या वाढली तरी ती परिस्थिती हाताळायला प्रशासन सज्ज आहे. पण, तरीही एप्रिल महिना काळजी घेण्याचा महिना आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. केंद्र सरकारने पंचेचाळीस वर्षे वयाच्या पुढील प्रत्येकाला लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पर्याप्त परिस्थितीत लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे दिसते. त्याबाबत राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची गरज आहे.

चव्हाण म्हणाले, लाॅकडाऊन झाले तर अर्थव्यवस्थेवर मोठे अरिष्ट परिणाम होतात. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसारच याबाबतचा निर्णय घेतला जावा. जर दुर्दैवाने असा निर्णय घ्यायला लागला तर केंद्र सरकारने पाश्चिमात्य देशांनी जसे लोकांच्या खात्यावर बुडणाऱ्या रोजगारांची भरपाई थेट बँकेत जमा केली तशी इथल्या लोकांच्या खात्यावर जमा करावी, अशी माझी मागणी आहे.

चौकट

नको असेल तर तसे सांगा

कराड व मलकापूर नगरपालिकेला तुम्ही रुग्णवाहिकेसाठी निधी दिला होता. मलकापूरची रुग्णवाहिका चार महिन्यांपूर्वी दाखल झाली आहे. पण, कराडची रुग्णवाहिका दिसत नाही. याबाबत विचारताच चव्हाण म्हणाले, मी निधी देण्याचे काम केले आहे. त्यांना तो निधी नको असेल तर त्यांनी तसे मला लेखी सांगावे. म्हणजे सदरचा निधी मला दुसरीकडे वर्ग करता येईल.

चौकट

वाझे प्रकरणातील फार माहिती नाही

सचिन वाझे प्रकरणाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता; मला त्या प्रकरणातील फार काही माहीत नाही. मी तुमच्या माध्यमातूनच त्याबाबत वाचत व ऐकत आहे. पण, प्रकरण गंभीर आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

चौकट

मनोमिलनाबाबतची चर्चा सुरू आहे

कृष्णा कारखाना निवडणुकीसंदर्भात तुम्ही कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. मग, दोन माजी अध्यक्ष मोहितेंचे मनोमिलन कधी होणार? याबाबत विचारताच पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत चर्चेची प्रक्रिया सुरू आहे, असे हसत हसत सांगितले.

चौकट

‘त्या’ कार्यकारिणी दोन दिवसांत जाहीर

कराड दक्षिण काँग्रेसची कार्यकारिणी तुम्ही जाहीर केलीत; उत्तर विधानसभा मतदारसंघाची का थांबली आहे? असा प्रश्न केल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, येत्या दोन दिवसांत कराड उत्तर व कराड शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.

फोटो : पृथ्वीराज चव्हाण

Web Title: The center should provide vaccines in proportion to the number of patients: Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.