मराठा समाज मंडळाकडून पोलीस दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST2021-01-04T04:31:22+5:302021-01-04T04:31:22+5:30

लोणंद : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने लोणंद येथील मराठा समाज मंडळाने लोणंद पोलीस स्टेशन येथे पोलीस दिन साजरा ...

Celebration of Police Day by Maratha Samaj Mandal | मराठा समाज मंडळाकडून पोलीस दिन साजरा

मराठा समाज मंडळाकडून पोलीस दिन साजरा

लोणंद : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने लोणंद येथील मराठा समाज मंडळाने लोणंद पोलीस स्टेशन येथे पोलीस दिन साजरा केला.

कोरोनासारख्या महाभयानक काळात ज्या पोलीस बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता योग्य नियोजन करून अविश्रांत आपले कर्तव्य बजावले, अशा पोलीस बांधवांसाठी पोलीस दिनाच्या निमित्ताने छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोणंद पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन मराठा समाज मंडळाकडून पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, सर्व पोलीस बांधव, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब इंदलकर, उपाध्यक्ष शुभम दरेकर, माजी अध्यक्ष बाळासाहेब कदम, अमोल चंद, शंभुराज भोसले, सदस्य गोपाल सिंह राजपुत, दत्ता भोईटे, मंगेश सावंत उपस्थित होते.

Web Title: Celebration of Police Day by Maratha Samaj Mandal