सलग चारशे जोर मारून बहीण-भावंडांकडून महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:11 IST2021-03-13T05:11:29+5:302021-03-13T05:11:29+5:30

कोळकीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्या रेश्मा देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख यांची पुतणी तनिष्का गजानन देशमुख ...

Celebrating Women's Day with four hundred siblings in a row | सलग चारशे जोर मारून बहीण-भावंडांकडून महिला दिन साजरा

सलग चारशे जोर मारून बहीण-भावंडांकडून महिला दिन साजरा

कोळकीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्या रेश्मा देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख यांची पुतणी तनिष्का गजानन देशमुख (वय १४), समीक्षा गजानन देशमुख (९) व मुलगा हर्षद संजय देशमुख (१२) यांनी उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. ग्रामपंचायतीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या देशमुख बहीणभावानी सलग चारशे जोर मारले. ते दररोज नियमितपणे पहाटे पाच वाजता उठून योग, सपाट्या, जोर असा व्यायाम करतात. त्यासाठी त्यांना संजय देशमुख यांचे व गजानन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमानंतर माजी सरपंच व ज्येष्ठ नेते दत्तात्रय शिंदे, सरपंच विजया नाळे यांनी मुलांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास नाळे, रमेश नाळे, अक्षय गायकवाड, गणेश शिंदे, शिवाजी भुजबळ, रेश्मा देशमुख, रूपाली चव्हाण, सपना कोरडे, वर्षा शिंदे, प्राजक्ता काकडे उपस्थित होते.

फोटो ११फलटण-जोर

कोळकी येथे तनिष्का देशमुख, समीक्षा देशमुख, हर्षद देशमुख यांनी महिलादिनी चारशे जोर मारले.

Web Title: Celebrating Women's Day with four hundred siblings in a row