यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : शितोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:04+5:302021-09-04T04:46:04+5:30
खटाव : ‘कोरोनाचे सावट अद्याप गेलेले नाही. याच परिस्थितीत गणेशोत्सव येत असल्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने ...

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : शितोळे
खटाव : ‘कोरोनाचे सावट अद्याप गेलेले नाही. याच परिस्थितीत गणेशोत्सव येत असल्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा,’ असे आवाहन पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी केले.
खटावमधील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ग्रामपंचायतीत आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कुदळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, राहुल जमदाडे, रमेश शिंदे, रवींद्र सकटे, प्रतीक विधाते, किरण राऊत, दीपक विधाते, कल्याण बोरगे, महेंद्र देशमुख, विशाल पवार, वैभव गुंजवटे, आबा कांबळे, अनिकेत देशमुख, रूपेश बोबडे उपस्थित होते.
शितोळे म्हणाले, ‘शासनाच्या नियमांचे पालन करून कोठेही त्याचे उल्लंघन न करता साधेपणाने याहीवर्षी गणेशोत्सव साजरा करावा. लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतील गणेश उत्सवाची संकल्पना खऱ्याअर्थाने ‘एक गाव एक गणपती’ यामध्येच समाविष्ट झाली आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर यासारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून हा गणेशोत्सव साजरा करावा. खटावचा आदर्श इतर गावातील गणेश मंडळ निश्चितच घेतील, यात शंका नाही.’
अशोक कुदळे यांनी प्रास्ताविक केले. राहुल जमदाडे यांनी आभार मानले.
फोटो ०३खटाव
खटावमध्ये गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब लोंढे, सरपंच नंदकुमार वायदंडे उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)