शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी, शिवमूर्तीची पालखीतून मिरवणूक; मंत्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 13:36 IST

किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची मंत्री ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली

सातारा : किल्ले प्रतापगड, ता. महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला.किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची शनिवारी सकाळी मंत्री ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.यावेळी मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून भक्तिभावाने पूजन करून भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivjayantiशिवजयंतीPratapgad Fortप्रतापगड किल्ला