सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:39 IST2021-09-11T04:39:58+5:302021-09-11T04:39:58+5:30

येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय ...

Celebrate Ganeshotsav through social activities! | सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करा!

सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करा!

येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, तहसीलदार आनंराव देवकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलीस निरीक्षक खोबरे उपस्थित होते.

प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, गणेशोत्सव सर्वांनी काळजीपूर्वक साजरा करावा. मंडळांनी वर्गणी व देणगीचा सामाजिक कामासाठी वापर करावा. तसेच कोरोनामुळे ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे, अशा कुटुंबांना मदत करावी. कोरोनावर मात करण्यासाठी तसेच सांभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हा प्रशासनाने लागू केलेले नियम सर्वांनी पाळावेत.

सध्या कोरोना काळात प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे असून मला काही होणार नाही, या भ्रमात कोणीच न राहता प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले.

- चौकट

निर्बंध सांगा, आम्ही पालन करू!

गणेश उत्सवाच्या बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांचा विचार होणार नसेल तर त्या सूचनांचा काय उपयोग, कशासाठी ही बैठक आहे, अशी नाराजी व्यक्त करीत नगरसेवक विनायक पावसकरांनी प्रशासनाने निर्बंध सांगावेत, आम्ही कोणतेही नियम मोडणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Celebrate Ganeshotsav through social activities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.