प्रयासने साजरा केला वडूजमध्ये वृक्षाचा पहिला वाढदिवस
By Admin | Updated: July 15, 2017 13:04 IST2017-07-15T13:04:36+5:302017-07-15T13:04:36+5:30
पोलिस निरिक्षक यशवंत शिर्के यांची उपस्थिती

प्रयासने साजरा केला वडूजमध्ये वृक्षाचा पहिला वाढदिवस
आॅनलाईन लोकमत
वडूज (जि. सातारा), दि. १५ : वाढदिवस हा केवळ मनुष्याचाच साजरा होतो, असे नाही. वडूज येथील प्रयास सामाजिक विकास संस्थेच्यावतीने गतवर्षी वृक्ष लागवड करण्यात आलेल्या रोपांचा वाढदिवस पोलिस निरिक्षक यशवंत शिर्के यांच्या उपस्थितीत साजरा केला.
यावेळी डॉ. कुंडलिक मांडवे, मुन्ना मुल्ला, रोहित शहा, डॉ. प्रवीण चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती किशोरी पाटील, नगरसेविका मंगल काळे, नगरसेवक सुनील गोडसे, वचन शहा, विपुल गोडसे, डॉ. प्रा. पी. डी. कुलकर्णी, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.