कऱ्हाडात विविध उपक्रमांनी जलदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:26+5:302021-03-24T04:37:26+5:30
कऱ्हाड : येथील पालिका, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब तसेच ग्रीनी दी ग्रेट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन साजरा करण्यात ...

कऱ्हाडात विविध उपक्रमांनी जलदिन साजरा
कऱ्हाड : येथील पालिका, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब तसेच ग्रीनी दी ग्रेट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पाणी वाचविण्याच्या संदर्भात शिवाजी सोसायटी, प्रीतीसंगम घाट, मल शुद्धिकरण प्रकल्प या ठिकाणी प्रतिज्ञा घेण्यात आली. शंभराहून जास्त नागरिक त्यामध्ये उपस्थित होते. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, जलअभियंता ए. आर. पवार, एन्व्हायरो नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशीद, चंद्रकांत जाधव, सुनील जाधव, अभय पांढरपट्टे, कल्याणी पवार, रविराज दाभाडे उपस्थित होते.
मसूरमध्ये शिक्षकांचा सत्कार उत्साहात
मसूर : येथील शिवाजी विद्यालयाचे उपशिक्षक आर. बी. मुळे यांनी निर्मिती केलेल्या शॉर्टफिल्मची विभागीय गटातून राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. त्याबद्दल त्यांचा मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाजी पवार, राजेंद्र जाधव, प्रशांत माने, अमित काटवटे उपस्थित होते. आर. बी. मुळे यांचा संस्थेचे अध्यक्ष व सचिव जयंत पाटील, खजिनदार संजय बदियानी, प्रकाश पाटील, मानसिंग पाटील, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी सत्कार केला.
शेरे स्टेशन येथे पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरू
कार्वे : शेरे स्टेशन (ता. कऱ्हाड) येथे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम यांच्या फंडातून पाण्याचे एटीएम सुरू करण्यात आले आहे. सरपंच संगीता निकम यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन झाले. या एटीएमद्वारे एक रुपयात चार लिटर व पाच रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. पंचायत समिती सदस्य निकम व सरपंच संगीता निकम यांनी यावेळी गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेस काही दिवसांतच प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जोशी व शाखा अभियंता महातो यांनी भेट देऊन एटीएमची माहिती घेतली. ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब पवार, शशिकांत निकम, किशोर निकम, जावेद शिकलगार, माजी सरपंच मोहनराव निकम, माजी सदस्य निवासराव पाटील, आप्पाजी निकम, शब्बीर मुजावर, सुखदेव सातपुते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कृष्णा संकुलात मनस्विनी कार्यक्रम उत्साहात
कऱ्हाड : वाठार (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा फाउंडेशन या शैक्षणिक संकुलात मनस्विनी २०२१ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खानापूरच्या मुख्याधिकारी व कृष्णा फाउंडेशनच्या माजी विद्यार्थिनी अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुष्यात स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत, असे मत अश्विनी पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक वैष्णवी पवार हिने केले. अनिता कुंभार यांनी आभार मानले. यावेळी अध्यापक कर्मचारी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
पाण्यासाठी सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा
कऱ्हाड : महाड येथे २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. या आठवणींना उजाळा देत कऱ्हाड शहरात पाणी वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. भीमशौर्य चॅरिटेबल ट्रस्ट व पंचशील सामाजिक विकास संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी स्वप्निल थोरवडे, ओंकार थोरवडे, संदीप बनसोडे, भारत थोरवडे, नितीन ढेकळे, मयूर थोरवडे, प्रशांत लादे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.