शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही मलकापुरात चौकात; पण दादागिरी आडवाटेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:50 IST

चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे मलकापूर शहरातील युवकांनीही हाणामारी करण्याची ठिकाणे बदलली आहेत. गत चार दिवसांत तीन ठिकाणी भांडणाचे प्रकार घडले असून, आडमार्गाच्या रस्त्यांवरच आता हाणामारीच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देगत चार दिवसांत तीन ठिकाणी राडा सुरूच मारामारीच्या घटनांत वाढ; भांडणाची ठिकाणे बदललीआडमार्गावर गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे चित्र बाहेरून आलेल्या युवकांचा राडा

मलकापूर , दि. २७ :  चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे शहरातील युवकांनीही हाणामारी करण्याची ठिकाणे बदलली आहेत. गत चार दिवसांत तीन ठिकाणी भांडणाचे प्रकार घडले असून, आडमार्गाच्या रस्त्यांवरच आता हाणामारीच्या घटना घडत आहेत.

मलकापुरात गुन्हेगारी रोखण्यासाठी नगरपंचायतीने आगाशिवनगर येथे झेडपी कॉलनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, शिवाजी चौक, कन्याशाळा परिसर अशा सहा ठिकाणी सोळा सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे चौकाचौकात होणाºया गुन्हेगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, गेली पाच दिवसांत घडलेल्या घटनांवरून आडमार्गावर गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे चित्र दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी मुलींची छेड काढल्याच्या कारणावरून युवकांच्यात बाचाबाची झाली. याच बाचाबाचीचा राग मनात धरून व मुलीची छेड काढल्याच्या घटनेचा संदर्भ घेऊन दुसऱ्या  दिवशी एकावर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आले. संबंधित जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना ताजी असतानाच नटराज थिएटरजवळ अज्ञात कारणावरून एकास बेदम चोप देण्यात आला. अशा पद्धतीने आगाशिवनगर व उपनगरात युवकांच्या गटात वारंवार मारामारी व भांडणाचे प्रकार घडत आहेत.

येथील कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डापुलाखाली किरकोळ कारणामुळे पोलिसांसमोरच युवकांच्या दोन गटांत राडा होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. उड्डाणपुलासह रुग्णालय परिसरात सलग हाणामारीच्या घटना घडल्यामुळे अनेकवेळा तणावाचे वातावरण निर्माण होते. युवकांच्या दोन गटांत किरकोळ कारणांवरून हाणामारी होत असते. त्यानंतर घटनास्थळावर पोलिस पोहोचेपर्यंत संबंधित युवक पसार होतात. त्यामुळे अशा घटनांची कोठेही नोंद होत नाही.बाहेरून आलेल्या युवकांचा राडामलकापुरात विविध संस्थेच्या शैक्षणिक शाखा उभारण्यात आल्या आहेत. शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय रुग्णालय, अनेक व्यवसाय व नोकरी निमित्ताने शहरात येणाऱ्याची संख्या मोठी आहे. अनेकवेळा परगावात झालेल्या भांडणाचे मलकापुरात उट्टे काढण्याच्या घटनाच वारंवार घडतात. त्यामुळे बाहेरून आलेल्या भांडणातील युवकांचाच राडा मलकापुरात घडत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस