अपघाती मृत्यूस कारणीभूत; अज्ञात चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:18+5:302021-09-18T04:42:18+5:30

सातारा : सातारा तालुक्यातील वेचले येथील एकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अज्ञात डंपरचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ...

Causes accidental death; Crime on an unknown driver | अपघाती मृत्यूस कारणीभूत; अज्ञात चालकावर गुन्हा

अपघाती मृत्यूस कारणीभूत; अज्ञात चालकावर गुन्हा

Next

सातारा : सातारा तालुक्यातील वेचले येथील एकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अज्ञात डंपरचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सतीश हणमंत होवाळे (रा. धामणेर, ता. कोरेगाव) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्यासुमारास सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील अंगापूर फाटा येथे हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अमित काशिनाथ जावळे (वय ३५, रा. वेचले) हे ठार झाले होते. जावळे हे दुचाकीवरून जात असताना जिहे गावच्या हद्दीतील अंगापूर फाटा येथे भरधाव डंपरने धडक दिली होती. यामध्ये जावळे यांच्या डोक्यास गंभीर जखम झाली होती. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक देव तपास करीत आहेत.

....................................................

Web Title: Causes accidental death; Crime on an unknown driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app