वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:43+5:302021-02-05T09:10:43+5:30
सातारा: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जिल्हा वाहतूक शाखेने पकडून दोघांना अटक केली. ही कारवाई ...

वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
सातारा: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जिल्हा वाहतूक शाखेने पकडून दोघांना अटक केली. ही कारवाई दि. २८ रोजी पहाटे खेड फाट्यावर करण्यात आली. सुरज संभाजी जाधव (रा. बावधन,ता.वाई), सागर दीपक चव्हाण (रा.कनुर,ता.वाई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यात अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्हा वाहतूक शाखेला महामार्गावर गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी फोैजदार खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून महामार्गावरून वाळूची होणारी अवैध वाहतूक रोखण्याचे पथक तैनात ठेवले. दि. २८ रोजी खाडे हे सहकाऱ्यांसह महामार्गावर गस्त घालत असताना खेड फाटा परिसरात त्यांना (एमएच ११ सीएच ४७६७) हा ट्रक वाळू वाहतूक करत असल्याचा संशय आला. त्यांनी चालकाला ट्रक थांबवण्याच्या सूचना करून पाहणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन ट्रक व वाळू असा ३० लाख रूपयांचा ऐवज जप्त करून पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिला.
जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अंतम खाडे, हवालदार अनिल पवार, दीपक क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.