मांजामुळे पक्ष्यांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:03+5:302021-02-06T05:15:03+5:30
....................... नियमांचे उल्लंघन सातारा : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र ...

मांजामुळे पक्ष्यांना धोका
.......................
नियमांचे उल्लंघन
सातारा : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र अतिउत्साही वाहनचालक सिग्नल मिळण्यापूर्वीच भरधाव वेगाने गाड्या हाकत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अपघातांचे प्रकार घडत आहेत. नियम तोडणाऱ्या संबंधितावर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
.................
रस्तादुरुस्तीची मागणी
सातारा : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पुसेगावसह नेर, धावडदरे, कटगुण, काटकरवाडी या गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांची वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेकदा या रस्त्यांवर लहान-मोठे अपघातही झाले आहेत. लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
..........................
मावळ्यांकडून स्वच्छता
सातारा : इतिहासाचा साक्षीदार असलेल्या भूषणगड किल्ल्यास भेट देत साताऱ्यातील मावळ्यांनी तेथील परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. युवकांच्या या बांधणीचे विशेष कौतुक होत आहे. रक्षक ग्रुपच्या माध्यमातून हे युवक कार्य करीत असतात. गडकोटांचे संवर्धन, संरक्षण व रक्षणाच्या हेतूने या ग्रुपचे कार्य सध्या सुरू आहे.
वाहतुकीसाठी खुला
सातारा : शाहूपुरी मोळाचा ओढा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता नागरिकांसाठी खुला केला. जिल्हा परिषोचे माजी सदस्य संजय पाटील यांनी पुढाकार घेत त्या रस्त्याची स्वखर्चातून डागडुजी केली. मोळाचा ओढा येथील आझादनगर, गंगासागर कॉलनी, चिंतामणी सोसायटी, ओंकार सोसायटीकडे जाणारा रस्ता काही व्यक्तींनी दगड व इतर वस्तू टाकून बंद केला होता.
.............................
पिकांचे नुकसान
सातारा : वन्यजीवांचा मानवी वस्तीसह शिवारातील पिकांमध्ये वावर वाढला असून, रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरा ही पिके जोमात आली आहेत. सध्या गहू, बाजरीमध्ये कणसे भरू लागली असून, रानडुकरे, गव्यांच्या झुंडी उभ्या पिकांमध्ये धुडगूस घालत आहेत.
..............................
रस्त्यावर अतिक्रमण
सातारा : शहरातील राजवाडा चौपाटीवरील बेशिस्तपणा यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोना पूर्वकाळातील राजवाडा चौपाटी खाऊ गल्ली म्हणून वापरली जात होती. कोरोनामुळे चौकटी बंद आहे. काही महिन्यापासून चौपाटीचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जात आहे.
.......
खड्ड्यांमुळे धोका
सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगर येथील वीज वितरण कंपनीसमोरील परिसरात वर्षापूर्वी गळती काढण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अनेकजण या खड्ड्यात पडून जायबंदी झाले आहेत.
.......
रस्ता वाहतुकीस अरुंद
सातारा : सातारा तालुक्यातील गोळेगाव व वेचले गावच्या सीमाभागाच्या हद्दीतील पुलाचे काम दोन वर्षांपर्यंत बंद असल्याने पावसाळ्यात तसेच सद्य:स्थितीत ऊस वाहतुकीसाठी अरुंद रस्त्यावरून वाहतूक करावी लागत आहे. या पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेने लक्ष घालून या पुलाचे अर्ध्यावर बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत येथील शेतकरी लहू चव्हाण यांनी केले आहे.
................
पहाटेच्या वेळी गर्दी
सातारा : सातारा शहर व परिसरामध्ये पाठीशी वेळी मॉर्निंग वाॅकला गर्दी होऊ लागली आहे वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाली होती. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दिवसभर कडक होऊन पडतच नाही.दुपारी जाणवत असला तरी रात्री व पहाटेच्या वेळी तापमानाचा पारा चांगलाच घसरत आहे.
.....
रुग्णवाहिका अडकली
सातारा : सातारा शहर शहरालगत वाढे फाटा उड्डाणपूल ते पाटखळ माथा फाटादरम्यान मंगळवारी (दि. २) दिवसभरात वारंवार रहदारी तुडुंब झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे सायंकाळी रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांचे हाल झाले. यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
....................
पाणीपुरवठा सुरळीत
सातारा : नगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या विलासपूर ग्रामपंचायत हद्दीतील तीन कॉलन्यांतील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सुस्कारा टाकला आहे. विलासपूरमध्ये पालिकेच्या स्वच्छता कामगाराकडून गटारीची स्वच्छता करताना फॉरेस्ट कॉलनी, गणेशनगर व राधिकानगर यांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली होती.
.........
प्रवासी त्रस्त
सातारा : येथील बसस्थानक परिसरात रस्त्याकडेला अस्ताव्यस्तपणे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत आहे. या वाहनांमुळे ये-जा करणारी वाहने दिसत नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. येथील पोलीस प्रशासनाने तातडीने वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे.
...........................