मारहाणप्रकरणी गोवेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST2021-01-08T06:02:56+5:302021-01-08T06:02:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा तालुक्यातील लिंब-गोवे येथे सासरा व सुनेस धक्काबुक्की, मारहाण केल्याप्रकरणी गोवे येथील चारजणांवर तालुका ...

In the case of beating in Goa | मारहाणप्रकरणी गोवेतील

मारहाणप्रकरणी गोवेतील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा तालुक्यातील लिंब-गोवे येथे सासरा व सुनेस धक्काबुक्की, मारहाण केल्याप्रकरणी गोवे येथील चारजणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बांधावरील कारणातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, याप्रकरणी प्रतीक्षा केवल भोसले यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर राजन संजय भोसले, संजय रामचंद्र भोसले, अक्षय संजय भोसले, अभिजित संजय भोसले यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. प्रतीक्षा भोसले व सासरे प्रकाश सर्जेराव भोसले हे गोवे येथील शिवारात शेतीच्या कामासाठी गेले होते. यावेळी शेताच्या बांधावर पाणी देण्यासाठी ठिबकच्या पाईप लावून ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रकाश भोसले यांनी ठिबकची पाईप समायिक रस्ता सोडून बाजूला लावा असे सांगितले. यावरून मारहाणीची घटना घडली. सहायक पोलीस निरीक्षक चौधरी तपास करत आहेत.

........

Web Title: In the case of beating in Goa