शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बेकायदेशीर गर्भलिंगनिदानप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 11:32 IST

फलटण तालुक्यातील उसाच्या फडात गर्भलिंगनिदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले

सातारा : फलटण तालुक्यातील उसाच्या फडात गर्भलिंगनिदान चाचणीसाठी गेलेल्या संशयित महिलेने बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात त्या महिलेसह तिघांवर वैद्यकीय गर्भपात अधिनियमांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फलटण तालुक्यातील उसाच्या फडात गर्भलिंगनिदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले. या महिलेच्या सखोल चाैकशीतून गर्भलिंगनिदान चाचणीच्या रॅकेटपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना आता नक्कीच यश येणार आहे. आरोग्य विभागाने केलेल्या चाैकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित महिला ज्या कारने गर्भलिंगनिदान चाचणीसाठी फलटणला गेली त्या कारचालकाने आरोग्य विभागाला लेखी जबाब दिला. किती तारखेला, किती वाजता फलटणला गेले, याची सविस्तर माहिती त्याने दिली. गाडीत बसल्यानंतर गर्भलिंगनिदानसाठी जात असल्याचे त्या कारचालकाला समजले. यासह अन्य गोपनीय माहिती त्याने जबाबात दिली, तसेच आरोग्य विभागानेही संबंधित महिलेच्या माहेरी आणि सासरी चाैकशी केल्यानंतर संशयास्पद बाबी त्यांच्या निदर्शनास आढळून आल्या. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी गुरुवारी वाई पोलिस ठाण्यात संबंधित महिला तिची जवळची व्यक्ती आणि तिसऱ्या अनोळखी व्यक्तीवर बेकायदेशीर ठिकाणी गर्भपात करवून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे. पोलिस, आरोग्य, तसेच महसूल विभागाने समन्वय साधून या प्रकरणाचा पुढील तपास करावा. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत आणि यापूर्वी झालेले प्रकार उघडकीस येतील. -डाॅ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी