शिरवळ हद्दीतून कार चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:20+5:302021-01-09T04:33:20+5:30

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी एका लॉजच्या पार्किंगमध्ये लावलेली दोन लाख रुपये किमतीची कार चोरट्याने चोरून नेली. या ...

The car was stolen from Shirwal border | शिरवळ हद्दीतून कार चोरीला

शिरवळ हद्दीतून कार चोरीला

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी एका लॉजच्या पार्किंगमध्ये लावलेली दोन लाख रुपये किमतीची कार चोरट्याने चोरून नेली. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बंगलोर, कर्नाटक येथील इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी-विक्री करणारे सरफुद्दीन मुस्तकीम शेख हे शिरवळ परिसरातील एका कंपनीमध्ये काही कामानिमित्त आले होते.

यावेळी सरफुद्दीन शेख हे काम पूर्ण न झाल्याने शिरवळ येथील एका लॉजवर राहण्याकरिता थांबले होते. दरम्यान, सरफुद्दीन शेख यांनी आपली दोन लाख रुपये किमतीची कार (एचआर २६ बीजे ४३४८) ही लॉजच्या पार्किंगमध्ये लावलेली होती. चोरट्याने संबंधित कार चोरून नेली आहे. ही घटना लॉजिंगच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबतची फिर्याद सरफुद्दीन शेख यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. अज्ञाताविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार आप्पासाहेब कोलवडकर तपास करीत आहेत.

Web Title: The car was stolen from Shirwal border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.