गाडी खड्ड्यात आदळल्याने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:45+5:302021-09-05T04:44:45+5:30

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हद्दीत तामिळनाडूहून पुण्याकडे साबुदाणा घेऊन निघालेल्या मालट्रकचा टायर महामार्गावरील खड्ड्यात फुटला. यामुळे ...

The car collided in a ditch and caught fire | गाडी खड्ड्यात आदळल्याने आग

गाडी खड्ड्यात आदळल्याने आग

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हद्दीत तामिळनाडूहून पुण्याकडे साबुदाणा घेऊन निघालेल्या मालट्रकचा टायर महामार्गावरील खड्ड्यात फुटला. यामुळे घर्षण झाल्याने लागलेल्या आगीमध्ये मालट्रकसह २१ टन साबुदाणा जळून खाक झाला. यामध्ये ३४ लाख ५२ हजार ७०२ रुपयांचे नुकसान झाले.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तामिळनाडू राज्यातील सेलम येथून पुणे येथील मार्केट यार्डमध्ये ९ लाख ५२ हजार ७०२ रुपये किमतीचा २१ टन साबुदाणा घेऊन मालट्रक (टीएन ५२ एल ९६७५) मालट्रक चालक चिथंबरन चंद्रन व दुसरा चालक संजय गांधी निघाले होते. ते शिरवळ हद्दीत आले असता, महामार्गावरील खड्ड्यात मालट्रकचे चाक आदळले. यामुळे टायर फुटून घर्षण झाले. यातच टायरने पेट घेतला. अचानकपणे लागलेली आग ट्रक चालकांनी विझविण्याचा प्रयत्न केला असता, आगीने रौद्ररूप धारण करीत मालट्रकला वेढा घातला.

घटनेची माहिती मिळताच, शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस अंमलदार प्रकाश फरांदे, मदन वरखडे, विकास इंगवले, शिवराज जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. शिरवळ औद्योगिक क्षेत्रातील एशियन पेंटस कंपनीच्या अग्निशमन बंबाच्या सहकार्याने एक तासांमध्ये आग विझवित नियंत्रण मिळविले.

यावेळी मालट्रकने महामार्गावरच पेट घेतल्याने पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. धुरामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होती. शिरवळ पोलीस व सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक युवकांनी वाहतूक सुरळीत केली. यावेळी मालट्रक जळून बेचिराख झाला होता. या घटनेची फिर्याद चिथंबरन चंदन यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली. पोलीस अंमलदार मदन वरखडे, शिवराज जाधव तपास करीत आहे.

चौकट

गॅस सिलिंडर स्फोटानंतर काचा दुकानावर

शिरवळ येथील मालट्रकला अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गावर भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. मालट्रकमध्ये चालकांनी स्वयंपाकासाठी आणलेला गॅस सिलिंडरचा आगीमुळे स्फोट झाला. यामुळे मालट्रकच्या काचा महामार्गा शेजारील फर्निचरच्या दुकानाच्या शटरवर येऊन पडल्या होत्या.

फोटो

०४शिरवळ-ॲक्सिडेंट

आशियायी महामार्ग ४७ वर शिरवळ हद्दीत खड्ड्यात टायर फुटून मालट्रकने पेट घेतल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले. (छाया : मुराद पटेल)

Web Title: The car collided in a ditch and caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.