शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात एक ठार, सात जण जखमी

By दीपक शिंदे | Updated: June 29, 2023 14:23 IST

ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना

म्हसवड : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या गाडीला लोधवडेनजीक सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण ठार, तर ७ जण जखमी झाले. कल्याण भोसले असे मृताचे नाव आहे. जखमी झालेले सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडीचे रहिवासी आहेत. घटनास्थळी दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि. अक्षय सोनवणे यांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्ताने कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पैलवान प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे कारने (एमएच ११ बीएच ०८९६) पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. गाडीतून चालक कल्याण भोसले (वय ४५) , अण्णा गाढवे (४२), पपू भिसे (४०), दादासो थोरात (४२), सागर भोसले, विजय माने (४५), श्रीमंत पवार (५०), रुद्र भोसले (सर्व रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) हे आठ जण प्रवास करत होते. गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाट्यानजीक त्यांची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावरून गाडी उंच उडाली अन थेट चार वेळा पलटी होत एका रानात जाऊन पडली. चिमुकला देत होता जखमींना धीर अपघाताची माहिती समजताच लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी येऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. रुद्र भोसले (वय १३) हा देखील गाडीत होता. तो सर्वांना धीर देत होता. जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून पुढील उपचारासाठी साताऱ्यात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सपोनि. अक्षय सोनवणे यांनी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू